MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' पहिल्या दिवशी किती कमाई करणार? मोडणार हा रेकॉर्ड?

Raja Shivaji Collection : 'राजा शिवाजी' पहिल्या दिवशी किती कमाई करणार? मोडणार हा रेकॉर्ड?

Raja Shivaji Collection : रितेश देशमुखच्या 'राजा शिवाजी' सिनेमाचा ट्रेलर रिलीज झाल्यापासून त्याची जोरदार चर्चा सुरू आहे. पण त्याला प्रेक्षकांकडून संमिश्र प्रतिसाद मिळाला. हा भव्य सिनेमा पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर धमाका करू शकेल का? 

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : Apr 23 2026, 12:52 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
15
राजा शिवाजीच्या ट्रेलरमुळे वाढल्या अपेक्षा
Image Credit : X

राजा शिवाजीच्या ट्रेलरमुळे वाढल्या अपेक्षा

'राजा शिवाजी'चा ट्रेलर रिलीज होताच सिनेमाबद्दल वातावरण तयार झालं. मोठी स्टारकास्ट आणि ऐतिहासिक कथेमुळे उत्सुकता तर वाढली, पण ट्रेलर अपेक्षेप्रमाणे तितकासा प्रभावी वाटला नाही.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
25
'राजा शिवाजी'ची तगडी स्टारकास्ट आणि मोठा स्केल
Image Credit : Youtube@JioStudios

'राजा शिवाजी'ची तगडी स्टारकास्ट आणि मोठा स्केल

'राजा शिवाजी'मध्ये रितेश देशमुख मुख्य भूमिकेत असून त्यानेच सिनेमाचं दिग्दर्शनही केलं आहे. त्याच्यासोबत संजय दत्त, अभिषेक बच्चन, विद्या बालन, सचिन खेडेकर, अमोल गुप्ते, भाग्यश्री, जेनेलिया देशमुख आणि जितेंद्र जोशी यांसारखे दिग्गज कलाकार महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत. सलमान खानचा कॅमिओ हे देखील एक खास आकर्षण आहे.

35
'राजा शिवाजी'च्या ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद
Image Credit : Facebook

'राजा शिवाजी'च्या ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद

ट्रेलरवर प्रेक्षकांनी संमिश्र प्रतिक्रिया दिली. मराठी आणि हिंदी कलाकारांना एकत्र पाहणं अनेकांना आवडलं, पण ट्रेलर 'अंगावर काटा आणणारा' वाटला नाही. अजय-अतुल यांचं संगीत प्लस पॉइंट मानलं जातंय, पण बाकी गोष्टी विशेष प्रभाव पाडू शकल्या नाहीत. सिनेमाचा स्केल मोठा दिसतो, पण अनेक ठिकाणी VFX कमजोर वाटले. काही सीन्स कृत्रिम वाटल्याने ट्रेलरचा प्रभाव कमी झाला. यामुळेच सिनेमाच्या ओपनिंगवर थोडा परिणाम होऊ शकतो.
45
महाराष्ट्रामध्ये 'राजा शिवाजी'ला बंपर ओपनिंग मिळण्याची शक्यता
Image Credit : ANI

महाराष्ट्रामध्ये 'राजा शिवाजी'ला बंपर ओपनिंग मिळण्याची शक्यता

हा सिनेमा १ मे २०२६ रोजी रिलीज होत आहे. या दिवशी महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाची सुट्टी आहे. छत्रपती शिवाजी महाराजांवर आधारित कथा आणि रितेश देशमुखची लोकप्रियता यामुळे महाराष्ट्रात सिनेमाला जबरदस्त ओपनिंग मिळण्याची अपेक्षा आहे.
 

55
राजा शिवाजी पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो?
Image Credit : Youtube@JioStudios

राजा शिवाजी पहिल्या दिवशी किती कमाई करू शकतो?

koimoi.com च्या रिपोर्टनुसार, ट्रेलरला संमिश्र प्रतिसाद मिळूनही 'राजा शिवाजी' पहिल्या दिवशी सर्व भाषांमध्ये मिळून ७ ते ११ कोटी रुपयांची नेट कमाई करू शकतो. ही रितेश देशमुखच्या करिअरमधील आतापर्यंतची सर्वात मोठी सोलो ओपनिंग ठरू शकते. याआधी त्याच्या 'वेड' सिनेमाने पहिल्या दिवशी २.२५ कोटींची कमाई केली होती.
Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मनोरंजन बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Honey Singh Nephew: हनी सिंगच्या पुतण्याचा जालंधरमध्ये भीषण अपघातात मृत्यू, कोण होता विदित ओलक?
Recommended image2
Kangana Ranaut: कंगना रनौत पुन्हा एकदा हॉरर सिनेमात, 'स्कॅरी पिक्चर'मधून प्रेक्षकांना घाबरवणार
Recommended image3
Sridevi Love Story : 'विवाहित पुरुषाशी लग्न करणार नाही' म्हणणारी श्रीदेवी 2 मुलांच्या वडिलांच्या प्रेमात कशी पडली?
Recommended image4
Aishwarya Rai Bachchan Birthday : देवदास ते धूम 2, ऐश्वर्याचे 10 आयकॉनिक ऑन-स्क्रीन लूक्स
Recommended image5
Meena Kumari : 200 सिनेमे गाजवणारी ही स्टार अभिनेत्री 30 वर्षे अज्ञातवासात का गेली?
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved