अभिनेता अक्षय कुमारची रेंज रोव्हर गाडी जम्मूमध्ये जप्त करण्यात आली आहे. ज्वेलरी शॉपच्या उदघाटनासाठी आलेल्या अक्षय कुमारवर मोटर वाहन कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याने कायद्याचे उल्लंघन केल्याचे पोलिसांनी म्हटले आहे.

बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमार हा परत एकदा अडचणीत सापडला आहे. अक्षय कुमार एका कार्यक्रमासाठी जम्मूमध्ये आला होता. तिथं आल्यानंतर त्याची गाडी जप्त करण्यात आली आहे. त्याची रेंज रोव्हर गाडी जप्त करण्यात आली आहे. ते जम्मूमधील मोटर वाहन कायद्याच्या अंतर्गत त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अक्षय कुमारने कायद्याचं उल्लंघन केलं 

अक्षय कुमारने कायद्याचं उल्लंघन केलं असून त्यासाठी काम केलं आहे. वाहतूक पोलिसांनी याबाबतची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटलं आहे की, सामान्य नागरिक असो व सेलिब्रेटी कायदा सर्वांसाठी समान आहे. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. अक्षय कुमारकडून मात्र याबाबत कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

जम्मूमध्ये ज्वेलरी शॉपच्या उदघाटनाला आला होता 

अक्षय कुमार हा जम्मूमध्ये ज्वेलरी शॉपच्या उदघाटनाला आला होता. यावेळी त्याने रेंज रोव्हर गाडीतून प्रवास केला होता आणि त्याची हीच गाडी जप्त करण्यात आली होती. अक्षय कुमारने ही गाडी भाड्याने घेतली होती. अभिनेत्याने डोगरा चौक ते जम्मू विमानतळ असा प्रवास केला होता. पोलिसांनी गाडी जप्त केली असून त्यावेळी संबंधित ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी केली होती.