MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Madhuri Dixit House : माधुरीचं ४८ कोटींचं घर, M.F. हुसैन यांच्या पेटिंग्सह पाहा आलिशान घराची झलक

Madhuri Dixit House : माधुरीचं ४८ कोटींचं घर, M.F. हुसैन यांच्या पेटिंग्सह पाहा आलिशान घराची झलक

माधुरी दीक्षितच्या वाढदिवसानिमित्त तिच्या कोट्यवधींच्या मुंबईतील घराची खास सफर करूया. पती श्रीराम नेने यांच्यासोबत तिने हे घर सजवलं आहे. या घरात एम. एफ. हुसैन यांची कोट्यवधींची दुर्मिळ चित्रं आहेत. चला, पाहूया या घराची एक झलक.

2 Min read
Author : Chanda Mandavkar
Published : May 15 2026, 08:24 AM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
13
माधुरी दीक्षितचे घर
Image Credit : Instagram

माधुरी दीक्षितचे घर

माधुरी आणि श्रीराम नेने यांचं मुंबईतील हे घर ५,५०० चौरस फुटांमध्ये पसरलेलं आहे. घरात शांत, मोकळं आणि प्रसन्न वाटावं अशी रचना केली आहे. मोठ्या खिडक्यांमधून घरात भरपूर नैसर्गिक प्रकाश येतो आणि अरबी समुद्राचं सुंदर दृश्य दिसतं. घराची सजावट अगदी साधी पण आकर्षक आहे. या घरात प्रसिद्ध चित्रकार एम. एफ. हुसैन यांच्या अमूल्य पेंटिंग्जचा संग्रह आहे. माधुरी आणि हुसैन यांच्यात एक खास नातं होतं. घरात १९९५ साली तयार केलेली 'डान्सिंग वुमन' आणि 'गणपती' ही दुर्मिळ चित्रं आहेत.
Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
23
एम.एफ. हुसैन यांचे पेटिंग
Image Credit : Instagram

एम.एफ. हुसैन यांचे पेटिंग

या घराचा प्रत्येक कोपरा कला आणि संस्कृतीने सजलेला आहे. घरात प्रवेश करताच पाहुण्यांचं स्वागत एका सुंदर डिझायनर कन्सोल आणि हुसैन यांच्या 'गणपती' पेंटिंगने होतं. लिव्हिंग रूमला लागूनच डायनिंग एरिया आहे, जिथे 'डान्सिंग वुमन' हे प्रसिद्ध चित्र लावलेलं आहे. माधुरीने एका मुलाखतीत सांगितलं होतं की, 'आपलं घर कलेचं संग्रहालय व्हावं', असं स्वप्न हुसैन यांनी पाहिलं होतं. ती भावनिक आठवण या घरातल्या प्रत्येक पेंटिंगमधून दिसते.

Related Articles

Related image1
थलापती विजयपाठोपाठ त्रिशा कृष्णनही राजकारणात? व्हायरल व्हिडिओमधून केला खुलासा
Related image2
Mouni Roy Divorce : मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या नात्यात मोठा ट्विस्ट, घटस्फोटामागचं खरं कारण आलं समोर!
33
आलिशान घर
Image Credit : Instagram

आलिशान घर

हे घर दिसायला आलिशान असलं तरी तेवढंच आपुलकीचं वाटतं. लिव्हिंग रूममध्ये गडद रंगाचे सोफे, सुंदर खुर्च्या आणि आकर्षक लाईटिंग आहे. घरात एक खास म्युझिक रूम आहे, जिथे गिटार, ड्रम्स आणि एक मोठी पियानो आहे. याशिवाय, एक ऑटोमेटेड बार आणि होम थिएटर सेटअपही आहे. मुंबईच्या समुद्रकिनाऱ्याकडे तोंड असलेला मास्टर बेडरूम शांत आणि आरामदायी वाटावा असा डिझाइन केला आहे. इथलं मार्बल फ्लोअरिंग आणि लाकडी छत यामुळे एक वेगळाच फील येतो. 

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

CM
Chanda Mandavkar
चंदा सुरेश मांडवकर एक अनुभवी प्रकार असून त्यांना मीडिया क्षेत्राचा 8 वर्षांचा अनुभव आहे. एका वृत्तवाहिनीमधून पत्रकाराच्या रुपात काम करण्यास सुरुवात केली. चंदा यांना लाइफस्टाइल, राजकीय आणि जनरल नॉलेज या विषयांमध्ये रस असून गेल्या 1 वर्षांहून अधिक काळ एशियानेट न्यूजमध्ये या विभागांसाठी काम करत आहेत. आपल्या वाचकांना सोप्या आणि सहज समजेल अशा भाषेत लिहण्याचा त्यांचा नेहमीच प्रयत्न असतो.
मनोरंजन बातम्या

Recommended Stories
Recommended image1
Nana Patekar : ... तर त्या रात्री नाना पाटेकरांना वाचवता आलं असतं?
Recommended image2
Hanuman Ansh Box Office: ९ व्या आठवड्यात 'कांतारा' आणि 'धुरंधर'लाही टाकलं मागे, पाहा कमाई
Recommended image3
Imran Khan: इम्रान खानला मुंबईत पोलिसांनी घेतलं ताब्यात, व्हॅनमधून सेल्फी शेअर करत म्हणाला...
Recommended image4
अमिताभ बच्चन यांना दिल्ली हायकोर्टाचे समन्स, १६ नोव्हेंबरला हजर राहण्याचे आदेश
Recommended image5
Sara Ali Khan Home : सारा अली खानच्या आलिशान घराचे खास फोटोज
Related Stories
Recommended image1
थलापती विजयपाठोपाठ त्रिशा कृष्णनही राजकारणात? व्हायरल व्हिडिओमधून केला खुलासा
Recommended image2
Mouni Roy Divorce : मौनी रॉय आणि सूरज नांबियारच्या नात्यात मोठा ट्विस्ट, घटस्फोटामागचं खरं कारण आलं समोर!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved