- Home
- Entertainment
- धोनीचा मेहुणाच क्रिती सनॉननं पटवला, पाहून म्हणाल पोरीनं तर लाखात देखणा पोरगा पाहिला
धोनीचा मेहुणाच क्रिती सनॉननं पटवला, पाहून म्हणाल पोरीनं तर लाखात देखणा पोरगा पाहिला
बॉलिवूड अभिनेत्री क्रिती सनॉन तिच्या अफेअरच्या चर्चांमुळे पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिने नुकतेच इंस्टाग्रामवर कबीर बाहियासोबत फोटो पोस्ट केले आहेत, ज्यामुळे त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब झाल्याचे मानले जात आहे.

धोनीचा मेहुणा क्रिती सनॉननं पटवला, पाहून म्हणाल पोरीनं तर लाखात देखणा पोरगा पाहिला
बॉलिवूडची अभिनेत्री क्रिती सनॉन ही कायमच अफेअरमुळे चर्चेत येत असते. आता परत एकदा ती तिच्यापेक्षा लहान बॉयफ्रेंडवरून चर्चेत आली आहे. तिचे अनेक दिवसांपासून कबीर बाहियासोबत नाव जोडलं जात होतं.
पण आता दोघांचे नाते अधिकृत झाल्याचं क्रितीने पोस्ट केलेल्या फोटोंवरून लक्षात आलं आहे. तिने दोघांचे इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत.
दोघांचे इंस्टाग्रामवर फोटो केले पोस्ट
दोघांचे क्रितीने इंस्टाग्रामवर फोटो पोस्ट केले आहेत. तिने पोस्ट केलेल्या फोटोंवरून दोघांमध्ये काहीतरी शिजत असल्याचं दिसून आलं आहे. दोघेही अबुधाबी येथील UFC 321 या कार्यक्रमाची पोस्ट केली आहे.
क्रितीने कबीरसोबत वाढदिवस केला साजरा
क्रितीने कबीरसोबत तिचा ३४वा वाढदिवस ग्रीस येथे साजरा केला. ते दोघे एकत्र वेळ घालवत असतानाचे अनेक फोटो आणि व्हिडीओ व्हायरल झाले होते. पण दोघांकडूनही अधिकृत नात्यात असल्याचा खुलासा करण्यात आला नव्हता.
कबीर बाहिया कोण आहे?
कबीर बाहिया हा एक ब्रिटिश व्यापारी असून त्याच शिक्षण ब्रिटिश बोर्डिंग स्कुलमध्ये झालं आहे. युके म्हणजेच इंग्लंड येथील उद्योजक कुलजींदर बाहिया यांचा तो मुलगा आहे. कबीर हा धोनीच्या जवळचा असून तो नात्याने त्याचा मेहुणा लागतो.

