अभिनेत्री खुशी मुखर्जीने एका मुलाखतीत तिच्या आयुष्यातील धक्कादायक किस्सा सांगितला आहे. एका कास्टिंग डायरेक्टरने तिला निर्मात्याला विकण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप तिने केला आहे. तसेच तिला कपड्यांमुळे अनेकदा ट्रोल केल्याबद्दलही तिने भाष्य केले आहे.

ख़ुशी मुखर्जी ही अभिनेत्री रियालिटी शो आणि वेब सिरीजमुळे प्रचंड प्रसिद्ध झाली आहे. सार्वजनिक ठिकाणी बोल्ड होऊन अंगप्रदर्शन केल्यामुळं ती कायमच ट्रोल होत आली आहे. आता नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत खुशीने तिच्या आयुष्यातील सर्वांत धक्कादायक किस्सा सांगितला आहे. एका कास्टिंग डायरेक्टरने मला निर्मात्याला विकण्याचा प्रयत्न केला होता, असा आरोप तिने केला.

मुखर्जी काय म्हणाली? 

“मी हैदराबादला कामाच्या शोधात गेली होती. तिथे एका कास्टिंग डायरेक्टरने मला एका निर्मात्याला विकण्याचा प्रयत्न केला. तुझी साइनिंग होईल, असं आश्वासन त्याने मला दिलं होतं. नंतर त्याने निर्मात्यासोबत माझी मिटींग घडवून आणली आणि मागून त्याला एक लाख रुपये दिले. नंतर निर्मात्याने मला जे म्हटलं ते ऐकून माझ्या पायाखालची जमीनच सरकली होती.

तुला माझ्यासोबत बेड शेअर करावा लागेल, असं तो म्हणाला. मला या सर्व गोष्टींबद्दल काहीच कल्पना नसल्याचं, मी त्याला सांगितलं. सुदैवाने तो निर्माता चांगला होता आणि त्याने मला जाऊ दिलं. मुंबईला परत येण्याची माझी तिकिट काढून दिली आणि त्याने मला सुरक्षित घरी पाठवलं. या इंडस्ट्रीत मी खूप काही सहन केलंय.”

खुशीला कपड्यांमुळे अनेकदा केलं आहे ट्रोल 

“मी अभिनेत्रीसोबतच एक फॅशन इन्फ्लुएन्सर आहे. मला जसे कपडे घालायचे असतील, तसे मी घालेन. मी पंजाबी सूटसुद्धा परिधान करते आणि जीन्स पण घालते. रेग्युलर जीन्स प्रत्येकजण घालतो, पण त्याला वेगळ्या पद्धतीने घालणं म्हणजे फॅशन असतं. एका सर्वसामान्य जीन्सला मी वेगळा लूक देण्याचा प्रयत्न केला होता” असं मत खुशीने व्यक्त केलं आहे.