- Home
- Entertainment
- Katrina Kaif Vicky Kaushal Love Story : पहिल्या भेटीपासून लग्नापर्यंत अशी जुळली दोघांची केमेस्ट्री!
Katrina Kaif Vicky Kaushal Love Story : पहिल्या भेटीपासून लग्नापर्यंत अशी जुळली दोघांची केमेस्ट्री!
Katrina Kaif Vicky Kaushal Love Story : कतरिना कैफ आई होणार आहे. अद्याप याची अधिकृत घोषणा केलेली नाही. पण सूत्रांच्या हवाल्याने रिपोर्ट्समध्ये दावा केला जात आहे की, तिची डिलिव्हरी ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये होईल. वाचा दोघांची लव्ह स्टोरी...

कतरिना कैफ-विकी कौशल पहिल्यांदा कुठे भेटले होते?
कतरिना कैफ आणि विकी कौशल यांची पहिली भेट 2019 मध्ये एका अवॉर्ड फंक्शनदरम्यान झाली होती. विकीने एका मुलाखतीत सांगितले, “तो कोणता अवॉर्ड फंक्शन होता हे मला आठवत नाही. पण कदाचित स्क्रीन अवॉर्ड होता. मी तो होस्ट करत होतो आणि मला वाटतं तिथेच माझी कतरिनाशी पहिली भेट झाली होती. स्टेजवर तुमच्या कानात एक उपकरण असतं, ज्यावर तुम्हाला सतत सूचना दिल्या जातात की हे करा, ते करा. सगळं काही स्क्रिप्टेड असतं. पण स्टेजच्या मागे पहिल्यांदाच आमची एकमेकांशी औपचारिक ओळख झाली होती.”
कतरिनाला पहिल्यांदा भेटताना विकी कौशल नर्व्हस होता का?
पिंकविलासोबत बोलताना विकीला विचारले की तो कतरिनाला भेटण्यापूर्वी नर्व्हस होता का, तेव्हा तो म्हणाला, 'नाही'. 'छावा'चे दिग्दर्शक लक्ष्मण उतेकर यांनी मस्करीत म्हटले, 'छावा नर्व्हस होतो का?' विकी म्हणाला, 'ती खूप गोड होती.'
झोया अख्तरच्या पार्टीत फुललं विकी-कतरिनाचं प्रेम
असं म्हटलं जातं की 2019 मध्ये झोया अख्तरच्या हाऊस पार्टीत विकी आणि कतरिनाच्या प्रेमाला बहर आला. ते पहिल्यांदा फिल्म कंपेनियनच्या टेपकास्टमध्ये एकत्र दिसले, जिथे त्यांनी एकमेकांची मुलाखत घेतली होती.
नियोजित भेटीशिवाय सुरू झाली विकी-कतरिनाची लव्ह स्टोरी
विकीने सांगितले, 'आमच्या भेटी ठरवून झालेल्या नव्हत्या. आम्ही अचानक भेटायचो. काही गोष्टी व्हायच्या असतात. एका वेळेनंतर आम्ही प्रश्न विचारणं थांबवलं आणि नात्यासाठी वचनबद्ध झालो.'
विकी कौशल आणि कतरिना कैफचं लग्न कधी झालं?
विकी आणि कतरिनाचे लग्न 9 डिसेंबर 2021 रोजी राजस्थानमधील सिक्स सेन्स फोर्ट बरवाडामध्ये झाले. कतरिनाचा पुढचा चित्रपट 'जी ले जरा' आहे, तर विकी 'लव्ह अँड वॉर' मध्ये दिसणार आहे जो 2026 मध्ये येईल.

