कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी दिवाळीच्या निमित्ताने आपला मुलगा विहानची पहिली झलक चाहत्यांना दाखवली आहे. विहानच्या पहिल्या वाढदिवसानंतर दुसऱ्याच दिवशी या कपलने एक सुंदर फॅमिली फोटो शेअर करत चाहत्यांना सरप्राईज दिलंय.
बॉलीवूड स्टार कतरिना कैफ आणि विकी कौशल यांनी आपल्या चाहत्यांना यंदाच्या दिवाळीत एक खास सरप्राईज दिलंय. त्यांनी त्यांचा मुलगा विहान कौशलची पहिली झलक जगासमोर आणली आहे. या कपलने ८ नोव्हेंबरला इंस्टाग्रामवर एक फॅमिली फोटो शेअर करत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. विशेष म्हणजे, ७ नोव्हेंबरला विहानने आपला पहिला वाढदिवस साजरा केला आणि त्यानंतर लगेचच ही गोड बातमी आली. फोटो शेअर करताना त्यांनी लिहिलंय की, यावर्षीची दिवाळी त्यांच्यासाठी सर्वात उज्वल आहे आणि त्यांनी सर्वांना सुख, प्रेम आणि प्रकाशाच्या शुभेच्छा दिल्या. हा फोटो पाहताच चाहत्यांनी त्यावर प्रेमाचा वर्षाव सुरू केला आहे.
रोशना अॅन रॉयची इंस्टाग्रामवर पेड सबस्क्रिप्शन सुविधा; पाहा फी आणि फायदे
कतरिना, विकी आणि विहानचा फेस्टिव्ह लूक
या फॅमिलीने दिवाळीसाठी खास मॅचिंग पारंपरिक कपडे निवडले होते. कतरिना पिवळ्या रंगाच्या सलवार सूटमध्ये खूपच सुंदर दिसत होती, तर विकीने बेज रंगाचा कुर्ता घातला होता. छोट्या विहाननेही आई-वडिलांना मॅचिंग असा बेज कुर्ता आणि त्यावर पिवळं जॅकेट घातलं होतं. सोशल मीडियावर हा गोड फॅमिली फोटो लगेचच व्हायरल झाला. अभिनेत्री अनन्या पांडेनेही यावर कमेंट करत 'Oh My God' लिहीत सोबत हार्ट इमोजी टाकले आहेत.
विकी कौशलने सांगितला बाप होण्याचा अनुभव
विकीने याआधीही बाप झाल्यानंतर आपल्या आयुष्यात कसा बदल झाला, यावर भाष्य केलंय. 'हरित झवेरी ज्वेलर्स'च्या यूट्यूब चॅनेलवर बोलताना त्याने सांगितलं की, पालकत्वाची भावना खूपच भावूक करणारी आहे. कतरिनाला विहानसोबत खेळताना पाहणं, आणि मुलाच्या हसण्यावर कतरिनाच्या चेहऱ्यावरील आनंद पाहताना वाटतं की ही वेळ इथेच थांबावी. बाप झाल्यामुळे जबाबदारीची जाणीव वाढली असून, एक माणूस म्हणून आपण अधिक संवेदनशील झालो आहोत, असंही तो म्हणाला.
कतरिना आणि विकीने ७ नोव्हेंबर २०२५ रोजी त्यांच्या मुलाच्या जन्माची बातमी सोशल मीडियावर दिली होती. त्यानंतर जानेवारी २०२६ मध्ये त्यांनी त्याचं नाव 'विहान कौशल' असल्याचं जाहीर केलं. तेव्हापासून त्यांनी विहानला मीडियापासून दूरच ठेवलं होतं, त्यामुळे दिवाळीला शेअर केलेला हा फोटो चाहत्यांसाठी खूपच खास ठरला आहे.














