- Home
- Entertainment
- Kantara Chapter 1 Box Office Collection Day 4 : ऋषभ शेट्टीच्या सिनेमाने 4 दिवसांत 300 कोटी कमावले, रविवारी एवढी कमाई केली!
Kantara Chapter 1 Box Office Collection Day 4 : ऋषभ शेट्टीच्या सिनेमाने 4 दिवसांत 300 कोटी कमावले, रविवारी एवढी कमाई केली!
Kantara Chapter 1 Box Office Collection Day 4 : ऋषभ शेट्टीचा चित्रपट 'कांतारा चॅप्टर 1' ने जगभरात 200 कोटी रुपयांची कमाई केल्यानंतर आता भारतातही या क्लबमध्ये सामील झाला आहे. चित्रपटाचे वर्ल्डवाइड कलेक्शन 300 कोटींच्या पुढे गेले आहे.

'कांतारा चॅप्टर 1' ने चौथ्या दिवशी किती कमाई केली?
ट्रेड ट्रॅकिंग वेबसाइट sacnilk.com च्या रिपोर्टनुसार, 'कांतारा चॅप्टर 1' ने चौथ्या दिवशी म्हणजेच पहिल्या रविवारी देशांतर्गत बॉक्स ऑफिसवर सुमारे 59.66 कोटी रुपयांचे कलेक्शन केले. ही कमाई तिसऱ्या दिवसाच्या तुलनेत 8 टक्क्यांनी जास्त आहे. चित्रपटाने तिसऱ्या दिवशी सुमारे 55 कोटी रुपये कमावले होते.
'कांतारा चॅप्टर 1' चे चार दिवसांचे कलेक्शन किती?
चार दिवसांत भारतात 'कांतारा चॅप्टर 1' चे नेट कलेक्शन 221.91 कोटी रुपयांवर पोहोचले आहे. चित्रपटाची माऊथ पब्लिसिटी इतकी जबरदस्त आहे की, पहिल्या आठवड्यातच भारतातील कमाई 300 कोटी रुपयांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे.
वर्ल्डवाइड 300 कोटींच्या जवळ पोहोचला 'कांतारा चॅप्टर 1'
जगभरात 'कांतारा चॅप्टर 1' चे कलेक्शन 300 कोटींच्या पुढे गेले आहे. पहिल्या तीन दिवसांत 235 कोटींचे ग्रॉस कलेक्शन झाले होते. चौथ्या दिवशी भारतात 59.66 कोटी कमावले. परदेशातील आकडेवारी जोडल्यावर हा आकडा सहज 300 कोटी पार करेल.
'कांतारा चॅप्टर 1'ने चार दिवसांत गाठले 5 मैलाचे दगड
'कांतारा चॅप्टर 1' ने चार दिवसांत हे मैलाचे दगड गाठले:
- 1 दिवसात 50 कोटी+
- 2 दिवसांत 100 कोटी+
- 3 दिवसांत 150 कोटी+
- 4 दिवसांत 200 कोटी+
- 4 दिवसांत वर्ल्डवाइड 300 कोटी+
'कांतारा चॅप्टर 1'ने निर्मात्यांना किती नफा दिला?
'कांतारा चॅप्टर 1' ची निर्मिती सुमारे 125 कोटी रुपयांमध्ये झाली आहे. भारतात त्याचे नेट कलेक्शन सुमारे 221.91 कोटी रुपये आहे. बजेट वजा केल्यास, 96.91 कोटी रुपयांचा महसूल मिळाला, जो खर्चाच्या 77 टक्क्यांपेक्षा जास्त आहे.
'कांतारा चॅप्टर 1' ची स्टार कास्ट
'कांतारा चॅप्टर 1' चे दिग्दर्शन ऋषभ शेट्टीने केले आहे. विजय किरगंदुर यांनी होंबाळे फिल्म्सच्या बॅनरखाली याची निर्मिती केली आहे. चित्रपटात ऋषभ शेट्टी मुख्य भूमिकेत आहे. त्यांच्याशिवाय रुक्मिणी वसंत, गुलशन देवैया आणि जयराम हे कलाकारही आहेत.
अनेक चित्रपटांना टाकले मागे
पहिल्या दिवसाच्या कमाईत कांताराने अनेक चित्रपटांना मागे टाकले आहे. कुली, छावा, सैयारा सारख्या मोठी कमाई करणार्या चित्रपटांचा यात समावेश आहे. आता कांतारा अखेर किती टप्पा गाठतो हे बघण्यासारखे असेल.
सर्व भाषांमध्ये कमाई
कांतारा हा चित्रपट सर्वच भाषांमध्ये चांगली कमाई करत आहे. केवळ कन्नड नव्हे तर तेलुगु, हिंदी भाषांमध्येही चित्रपटाने छप्परफाड कमाई केली आहे. हा दिवाळीचा सुपरहिट चित्रपट ठरणार असल्याचे दिसून येते.

