गोविंदाने 'या' मराठी अभिनेत्रीसाठी सुनीताशी तोडले संबंध, नाव ऐकून व्हाल हैराण
अभिनेता गोविंदा एकेकाळी मराठी अभिनेत्री नीलम कोठारीच्या प्रेमात होता, ज्यामुळे त्याने त्याची पत्नी सुनीता आहुजासोबतचा साखरपुडा मोडला होता. गोविंदाने १९९० मध्ये एका मुलाखतीत कबूल केले की तो एकाच वेळी दोघींसोबत नात्यात होता.

गोविंदाने 'या' मराठी अभिनेत्रीसाठी सुनीताशी तोडले संबंध, नाव ऐकून व्हाल हैराण
गोविंदा हा कायमच माध्यमांच्या चर्चेत राहत असतो. त्याच्या आणि पत्नी सुनीताच्या नात्यात अधूनमधून चढ उतार येत जात राहिले. गोविंदाने त्याची पत्नी सुनिताशी साखरपुडा मोडला होता हे फार कमी लोकांना माहित असेल.
गोविंदाने साखरपुडा का मोडला?
गोविंदाने त्याची पत्नी सुनीताशी झालेला साखरपुडा मोडला होता. तो एका मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात पूर्ण वेडा झाला होता आणि त्यामुळं त्यानं सुनीता आहुजाशी झालेला साखरपुडा मोडला होता.
गोविंदा कोणत्या अभिनेत्रीच्या प्रेमात होता?
गोविंदा हा एका मराठी अभिनेत्रीच्या प्रेमात होता, त्यावेळी त्याचा साखरपुडा खरंच मोडतो की काय अशी परिस्थिती निर्माण झाली होती. तो त्या काळात मराठी अभिनेत्री नीलम कोठारीच्या प्रेमात पडला.
गोविंदाने कबुली कधी दिली?
गोविंदाने याबाबतची कबुली १९९० मध्ये एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीमध्ये दिली होती. त्यानं सांगितलं की, “जितके मी तिला (नीलम कोठारी) ओळखत गेलो, तितकी ती मला आवडत गेली. ती अशी स्त्री होती, जिच्यावर कोणताही पुरुष फिदा होईल.”
तो एकाचवेळी दोघींसोबत नात्यात होता
जेव्हा गोविंदाने सुनीताशी साखरपुडा केला होता तेव्हा तो नीलमसोबतही रिलेशनशिपमध्ये होता. या चर्चा माध्यमांमध्ये सुरु झाल्या होत्या. त्याने नीलमपासून साखरपुडा झाल्याची बातमी लपवून ठेवली होती.
नंतर नीलमसोबत लग्न करणार होता
नंतर सुनीताशी साखरपुडा मोडल्यानंतर नीलमशी लग्न करणार होता पण नंतर त्याचे लग्न सुनीताशी झाले. या जोडप्याच्या लग्नाला आता जवळपास ३८ वर्ष पूर्ण झाली आहेत.

