MalayalamNewsableKannadaKannadaPrabhaTeluguTamilBanglaHindiMarathiMyNation
Add Preferred SourceGoogle-icon
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • लेटेस्ट न्यूज
  • मनोरंजन
  • लाइफस्टाइल
  • वेब स्टोरीज
  • यूटिलिटी न्यूज
  • मुंबई
  • भारत
  • महाराष्ट्र
  • स्पोर्ट्स
  • गुन्ह्याच्या बातम्या
  • विश्व
  • गेम्स
  • Home
  • Entertainment
  • Entertainment: 'जुम्मा चुम्मा' गर्ल आठवते? पाहा आता काय करतेय ही 'टार्झन गर्ल'

Entertainment: 'जुम्मा चुम्मा' गर्ल आठवते? पाहा आता काय करतेय ही 'टार्झन गर्ल'

Entertainment: 1980-90 च्या दशकात 'जुम्मा चुम्मा' गाण्यामुळे देशभरात धुमाकूळ घालणारी किमी काटकर करिअरच्या शिखरावर असताना लग्न करून सिनेसृष्टीपासून दूर गेली. पण तुम्हाला माहितीये का, की किमी काटकर आता कुठे आहे आणि काय करते?

2 Min read
Author : Marathi Desk 1
Published : May 24 2026, 09:21 PM IST
Share this Photo Gallery
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Whatsapp
  • GNFollow Us
16
किमी काटकर कशी बनली बॉलिवूडची ‘टार्झन गर्ल’?
Image Credit : Facebook

किमी काटकर कशी बनली बॉलिवूडची ‘टार्झन गर्ल’?

किमी काटकरनं फक्त 17 वर्षांची असताना मॉडेलिंग सुरू केलं. तिची आई मीना फर्नांडिस यांचाही सिनेमांशी संबंध होता. किमीने 1985 मध्ये 'पत्थर दिल' सिनेमातून पदार्पण केलं, पण त्याच वर्षी आलेल्या 'Adventures of Tarzan' ने तिला रातोरात स्टार बनवलं. सिनेमातील तिच्या बो*ड अंदाजामुळे आणि स्क्रीन प्रेझेन्समुळे ती खूप चर्चेत आली. यानंतर लोक तिला 'टार्झन गर्ल' म्हणू लागले आणि ती 80-90 च्या दशकातील सर्वात ग्लॅमरस स्टार्सपैकी एक बनली.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred
26
किमी काटकरनं एका वर्षात केले 15 सिनेमे
Image Credit : Facebook

किमी काटकरनं एका वर्षात केले 15 सिनेमे

'टार्जन गर्ल' म्हणून ओळख मिळाल्यानंतर किमी काटकरची लोकप्रियता झपाट्याने वाढली. तिने 'लहू', 'दरिया दिल', 'सोने पे सुहागा', 'गैर कानूनी' आणि 'खून का कर्ज' यांसारख्या सिनेमांमध्ये काम केलं. 1989 मध्ये तिचे तब्बल 15 सिनेमे रिलीज झाले होते, जी त्या काळात कोणत्याही अभिनेत्रीसाठी खूप मोठी गोष्ट होती. त्यावेळी तिची गणना बॉलिवूडमधील सर्वात व्यस्त अभिनेत्रींमध्ये होत होती.

Related Articles

Related image1
Entertainment: 12 हिरोंनी नाकारला, पण बिग बींनी केला; या सिनेमानं रचला इतिहास!
Related image2
Entertainment: जाणून घ्या 4000 कोटींच्या 'रामायण' चित्रपटाच्या बजेटचा हिशोब!
36
‘जुम्मा चुम्मा’ने किमी काटकरला बनवलं नॅशनल सेन्सेशन
Image Credit : Instagram

‘जुम्मा चुम्मा’ने किमी काटकरला बनवलं नॅशनल सेन्सेशन

अमिताभ बच्चन यांच्यासोबत 'हम' सिनेमातील 'जुम्मा चुम्मा' हे गाणं किमी काटकरच्या करिअरचा सर्वात मोठा टर्निंग पॉइंट ठरलं. हे गाणं त्या काळातलं मेगा चार्टबस्टर बनलं आणि किमीला 'जुम्मा चुम्मा गर्ल' हा टॅग मिळाला. आजही लोक तिला याच नावाने ओळखतात. तिच्या स्क्रीन प्रेझेन्सने आणि डान्स स्टाइलने तिला देशभरात प्रचंड लोकप्रिय केलं.
46
किमी काटकरनं करिअरच्या पीकवर का सोडली इंडस्ट्री?
Image Credit : Facebook

किमी काटकरनं करिअरच्या पीकवर का सोडली इंडस्ट्री?

जेव्हा किमी काटकरचं करिअर टॉपवर होतं, तेव्हाच तिने अचानक फिल्म इंडस्ट्री सोडण्याचा निर्णय घेतला. 1992 मध्ये तिने फोटोग्राफर आणि जाहिरात फिल्ममेकर शांतनु शौरी यांच्याशी लग्न केलं आणि सिनेमांपासून दूर झाली. या निर्णयाबद्दल किमी म्हणाली होती, "त्यावेळी मला वाटलं नाही की मी प्रोफेशनल आणि पर्सनल आयुष्य एकत्र सांभाळू शकेन. त्या काळात तुम्हाला सिंगल दिसावं लागायचं. तुम्ही फक्त त्यांचेच आहात, असं लोकांना वाटायचं. तेव्हा मी विचार केला की आयुष्य एकच आहे आणि मला सगळं जगायचंय. मी मॉडेल बनले, सिनेमात आले आणि अमिताभ बच्चन यांच्यासारख्या स्टारसोबत काम केलं. पण मला कमी वयात आईसुद्धा बनायचं होतं."

56
आता कुठे आहे किमी काटकर?
Image Credit : X

आता कुठे आहे किमी काटकर?

सिनेमांपासून दूर झाल्यानंतर किमी काटकर लाइमलाइटपासूनही लांब राहिली. अनेक वर्षं ती पती आणि मुलासोबत ऑस्ट्रेलियामध्ये राहिली. नंतर मुलाच्या शिक्षणासाठी भारतात परतली आणि पुण्यात स्थायिक झाली. 80-90 च्या दशकातील इतर अभिनेत्रींप्रमाणे तिने रिॲलिटी शो किंवा कमबॅकचा मार्ग निवडला नाही. आता तिला कुटुंबासोबत शांत आयुष्य जगायला आवडतं.
66
आता आजी बनली आहे ‘जुम्मा चुम्मा गर्ल’
Image Credit : Instagram

आता आजी बनली आहे ‘जुम्मा चुम्मा गर्ल’

काही काळापूर्वी 'Sussegad Stories with Sheeba' मध्ये आलेल्या किमी काटकरनं सांगितलं की, ती आता गोव्यात आपल्या कुटुंबासोबत राहते आणि आजी होण्याचा आनंद घेत आहे. तिने 6 महिन्यांचा बेकिंग कोर्स केल्याचंही सांगितलं आणि आता तिला बेकिंगची खूप आवड निर्माण झाली आहे. तिने अनेक वर्षांपूर्वी बॉलिवूड सोडलं असलं तरी, तिचा 'जुम्मा चुम्मा' अंदाज आजही चाहत्यांच्या मनात जिवंत आहे.

Entertainment News (मनोरंजन बातम्या): Get Entertainment News & Live updates in Marathi. Stay updated with Marathi Celeb gossips and Marathi Cinema news, Matahi movie trailers, reviews, and TV shows in Marathi at Asianet Marathi News.

About the Author

MD
Marathi Desk 1
मनोरंजन बातम्या

Gold & Metal Rates

Loading rates…

All cities ›
Recommended Stories
Recommended image1
Kanika Kapoor : कनिका कपूर आणि गौतम हाथीरमानी यांचा घटस्फोट, ४ वर्षांनंतर वेगळे होण्याचा निर्णय
Recommended image2
Tusshar Kapoor Threat : टायगर श्रॉफनंतर आता तुषार कपूरला 5 कोटींच्या खंडणीची धमकी
Recommended image3
Hanuman Ansh Movie Controversy : 450 कोटींच्या कमाईनंतर 'हनुमान अंश'च्या टीममध्ये फूट, हक्कांसाठी निर्मात्यांमध्ये वाद
Recommended image4
King Movie : 'तू मिल जाए' गाण्यात शाहरुखसोबत लेक सुहाना खान? चाहत्यांना दिसली एक झलक
Recommended image5
Ranbir Kapoor : 'रामायण'च्या ट्रोलिंगवर रणबीर कपूरने सोडलं मौन, म्हणाला 'कुछ तो लोग...'
Related Stories
Recommended image1
Entertainment: 12 हिरोंनी नाकारला, पण बिग बींनी केला; या सिनेमानं रचला इतिहास!
Recommended image2
Entertainment: जाणून घ्या 4000 कोटींच्या 'रामायण' चित्रपटाच्या बजेटचा हिशोब!
Asianet
Follow us on
  • Facebook
  • Twitter
  • YT video
  • insta
  • About Website
  • Terms of Use
  • Privacy Policy
  • CSAM Policy
  • Complaint Redressal - Website
  • Compliance Report Digital
  • Investors
© Copyright 2026 Asianxt Digital Technologies Private Limited (Formerly known as Asianet News Media & Entertainment Private Limited) | All Rights Reserved