Ek Tha Tiger Re-Release : सलमान खानचा आयकॉनिक चित्रपट 'एक था टायगर' पुन्हा एकदा प्रदर्शित होणार आहे. यामुळे चाहत्यांना YRF स्पाय युनिव्हर्स लाँच करणाऱ्या या अ‍ॅक्शन-पॅक्ड थ्रिलरचा आनंद पुन्हा एकदा अनुभवता येईल.

Ek Tha Tiger Re-Release : बॉलिवूडचा दबंग सलमान खान याचा ‘एक था टायगर’ सिनेमा पुन्हा सिनेमागृहांमध्ये रिलीज होणार आहे. हा धमाकेदार अ‍ॅक्शन थ्रिलर सिनेमा पाहण्यासाठी सलमानचे चाहते अधिक उत्सुक आहेत. वर्ष 2021 रोजी एक था टायगर सिनेमा प्रदर्शित करण्यात आला होता. तेव्हा सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बक्कळ कमाई केली होती. अशातच आता सिनेमा पुन्हा री-रिलीज करण्यात येणार असल्याने चाहते आणि प्रेक्षक याला किती प्रतिसाद देतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. 

एक था टायगर री-रिलीज होणार

कबीर खान यांनी एक था टायगर सिनेमाचे दिर्ग्दशन केले होते. या सिनेमामध्ये सलमान खान मुख्य भूमिकेत झळकला आहे. जबरदस्त अ‍ॅक्शन सीक्वेन्स, हाय-ऑक्टेन थ्रिल आणि एक रोमांचक कथानक असलेला 'एक था टायगर' हा सर्वकालीन ब्लॉकबस्टर ठरला. यात कतरिना कैफ हिनेही धमाकेदार भूमिका साकारली होती, तसेच रणवीर शौरी, रोशन सेठ, गिरीश कर्नाड आणि गेवी चहल यांच्यासारख्या प्रतिभावान कलाकारांचा समावेश होता.

ज्या चाहत्यांनी मूळ प्रदर्शनादरम्यान चित्रपटगृहात हा चित्रपट पाहण्याची संधी गमावली, त्यांच्यासाठी ही एक पर्वणी ठरणार आहे. अ‍ॅक्शनने भरलेला हा सिनेमा ज्या पद्धतीने पाहिला पाहिजे त्या पद्धतीने आता मोठ्या पडद्यावर पाहता येणार आहे.

Scroll to load tweet…

सलमान खानच्या कामाबद्दल…

सलमान खान त्याचा आगामी चित्रपट, ‘बॅटल ऑफ गलवान’ मध्ये झळकणार असून तो लवकरच रिलीज होणार आहे. या सिनेमातील सलमानचा फर्स्ट लूकही समोर आला होता. याशिवाय ‘बजरंगी भाईजान-2’ सिनेमात सलमान मुख्य भूमिकेत दिसणार आहे. या सिनेमाचे दिग्दर्शन कबीर खान करणार आहे. अशातच सलमानच्या या दोन सिनेमांबद्दल सतत अपडेट्स आणि रिलीज होण्याची तारीख जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्या चाहत्यांमध्ये आहे.