Box office collection 12th august: मंगळवारी चित्रपटांनी किती कमाई केली?
१२ ऑगस्ट रोजी 'सन ऑफ सरदार २' ने ३.७५ कोटींची कमाई केली असून एकूण कलेक्शन ४२ कोटींवर पोहोचले आहे. 'सैयारा'ने १.२५ कोटी कमावत एकूण ३२४ कोटींचा आकडा गाठला आहे. 'महाअवतार नरसिम्हा'ने ५ कोटी कमावले असून एकूण कमाई १७१ कोटींवर पोहोचली आहे.

Box office collection 12th august: मंगळवारी चित्रपटांनी किती कमाई केली?
तिकीट खिडकीवर सैयारा आणि महाअवतार नरसिम्हा हे चित्रपट चांगले चालले आहेत. सन ऑफ सरदार २ या चित्रपटाने ठीकठाक कमाई केली.
Son Of Sardar 2
सन ऑफ सरदार या चित्रपटाच्या पहिल्या भागात अजय देवगण आणि सोनाक्षी सिन्हा या दोघांनी मिळून काम केलं होत. आता सन ऑफ सरदार २ तिकीटबारीवर आला असून त्यानं ३.७५ कोटींची कमाई केली. तसेच या चित्रपटाची एकूण कमाई ४२ कोटींवर जाऊन पोहचली आहे.
Saiyaara
सैयारा हा चित्रपट तिकीट खिडकीवर अनेक दिवसांपासून चांगला सुरु आहे. काल या चित्रपटाने १.२५ कोटींची कमाई केली. या चित्रपटाचं एकूण कलेक्शन हे ३२४ कोटी झालं आहे.
Mahavatar Narsimha
महाअवतार नरसिम्हा हा चित्रपट गेल्या अनेक दिवसांपासून चांगला चालला असून त्यानं मंगळवारी ५ कोटींची कमाई केली आहे. एकूण या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर १७१ कोटी कमावले आहेत.
Su From So
सु फ्रॉम सो या कन्नड चित्रपटाने तिकीट खिडकीवर ठीक ठाक कमाई केली आहे. त्यानं १.७५ कोटींचे काल बॉक्स ऑफिसवर कलेक्शन केलं असून त्यांचं एकूण कलेक्शन ६८ कोटी रुपये झालं आहे.