Shah Rukh Khan Injured : 'किंग'च्या शूटिंगदरम्यान अपघात, शाहरुख खान सेटवर जखमी!
मुंबई- आगामी 'किंग' चित्रपटाच्या अॅक्शन सीनच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुख खान जखमी झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले. डॉक्टरांनी एक महिना विश्रांती घेण्याचा सल्ला दिला आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, त्याच्यावर अमेरिकेतही उपचार करण्यात आला.

सुहाना खानसोबत पहिली स्क्रीन झलक
शाहरुख खान 'किंग' चित्रपटात दिसणार आहे, या चित्रपटात त्याची मुलगी सुहाना खानसोबत त्याची पहिली स्क्रीन झलक असेल. पण सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शाहरुख खान चित्रपटाच्या सेटवर जखमी झाला आहे.
तातडीने रुग्णालयात नेण्यात आले
इंडिया टुडेच्या एका वृत्तानुसार, शाहरुख मुंबईतील गोल्डन टोबॅको स्टुडिओमध्ये एका अॅक्शन सीनचे चित्रीकरण करत होता, तेव्हा सेटवर हा अपघात झाला. त्याला तातडीने रुग्णालयात नेण्यात आले.
अमेरिकेत उपचार घेतला
एका सूत्राच्या हवाल्याने वृत्तात म्हटले आहे की शाहरुखला कामातून एक महिन्याचा ब्रेक घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे. "जखम काय आहे आणि किती गंभीर आहे, ही सर्व माहिती सध्या गुप्त ठेवण्यात आली आहे, पण शाहरुख उपचारासाठी अमेरिकेत गेला होता.
स्नायूंची दुखापत
त्याचबरोबर, सूत्राने असेही सांगितले की ही काही गंभीर बाब नाही, तर स्नायूंची दुखापत आहे. गेल्या काही वर्षांत, स्टंट करताना शाहरुखला त्याच्या शरीराच्या अनेक स्नायूंना दुखापत झाली आहे.
शाहरुख खानला बरे होण्यासाठी ३० दिवस लागू शकतात
सूत्राने पुढे सांगितले की, "'किंग'चे पुढील शेड्यूल आता सप्टेंबर किंवा ऑक्टोबरमध्येच सुरू होऊ शकते, कारण शाहरुखला सुमारे एक महिना बेड रेस्ट घेण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
जोमाने सेटवर परत येईल
इंडिया टुडेच्या अहवालानुसार, शाहरुख उपचारासाठी अमेरिकेला गेला होता. सध्या तो युनायटेड किंगडममध्ये (UK) असून, तिथेच त्याचा उपचार सुरू आहे आणि तो बरा होतोय. त्याच्या सोबत कुटुंबीय देखील आहेत.
एका सूत्राने सांगितले की, जखम किरकोळ आहे आणि अभिनेता लवकरच पूर्णपणे बरा होईल, अशी अपेक्षा आहे.
'किंग'चे सर्व शूटिंग स्थगित
टाइम्स नाऊने एका पोर्टलचा हवाला देत म्हटले आहे की 'किंग'चे सर्व शूटिंग बुकिंग, जे जुलै ते ऑगस्ट दरम्यान फिल्म सिटी गोल्डन टोबॅको स्टुडिओ आणि वायआरएफ स्टुडिओमध्ये होणार होते, जरा स्थगित ठेवले आहे.
तर शुटिंगवर परतण्याची शक्यता
मात्र, शाहरुख आणि त्याच्या टीमने अद्याप ही बातमीची पुष्टी केलेली नाही. म्हणजेच तो लवकर बरा झाला तर शुटिंगवर परतण्याची शक्यता आहे.

