Bigg Boss 19 : बिग बॉस 19 मधील डबल एलिमिनेशनमुळे चाहते थक्क झाले आहेत. दोन तगडे स्पर्धक फिनालेच्या अगदी आधी घराबाहेर पडले आहेत. गौरव खन्ना 'तिकिट टू फिनाले' जिंकून पहिला फायनलिस्ट बनला.
Bigg Boss 19 : बिग बॉस 19 च्या चाहत्यांना या आठवड्यात मोठा धक्का बसणार आहे. दोन तगडे स्पर्धक फिनालेच्या एक आठवडा आधीच घराबाहेर पडले आहेत. रिपोर्ट्समध्ये तरी असा दावा केला जात आहे. यापैकी एका स्पर्धकाने शोच्या पहिल्या दिवशी घरात प्रवेश केला होता, तर दुसऱ्याची वाइल्ड कार्ड एन्ट्री झाली होती. अद्याप शोचे निर्माते किंवा चॅनलकडून याबाबत कोणतीही अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, पण इंटरनेट आणि मीडिया रिपोर्ट्समध्ये याची जोरदार चर्चा सुरू आहे.
'बिग बॉस 19' मधून एलिमिनेशनसाठी कोण-कोण नॉमिनेट?
'बिग बॉस 19' मध्ये या आठवड्यात संपूर्ण घर नॉमिनेट झाले होते. यामध्ये गौरव खन्ना, अशनूर कौर, प्रणीत मोरे, अमाल मलिक, तान्या मित्तल, फरहाना भट्ट आणि मालती चाहर यांचा समावेश होता. मात्र, नंतर गौरव खन्ना 'तिकिट टू फिनाले' जिंकून केवळ पहिला फायनलिस्टच बनला नाही, तर त्याला घराचा शेवटचा कॅप्टनही बनवण्यात आले. त्यामुळे त्याला इम्युनिटी मिळाली आणि नॉमिनेशनमधून त्याचे नाव वगळण्यात आले. गौरव वगळता उर्वरित 6 स्पर्धकांवर एलिमिनेशनची टांगती तलवार होती.
अशनूर कौर घराबाहेर
रिपोर्ट्सनुसार, टीव्ही अभिनेत्री अशनूर कौर 'बिग बॉस 19' च्या घरातून बाहेर पडली आहे. तिला सर्वात कमी मतं मिळाल्यामुळे घराबाहेर काढण्यात आल्याचे म्हटले जात आहे. मात्र, अनेक इंटरनेट युजर्सच्या मते, 'तिकिट टू फिनाले' टास्कदरम्यान तान्या मित्तलवर हल्ला केल्यामुळे तिला बाहेर काढण्यात आले आहे. लोक अशनूरच्या एलिमिनेशनला चुकीचे ठरवत आहेत आणि बिग बॉसला ट्रोल करत आहेत. अशनूरच्या जागी मालती चाहरला बाहेर काढायला हवे होते, असे त्यांचे म्हणणे आहे. अशनूरने 'बिग बॉस 19' मध्ये पहिल्या दिवशी प्रवेश केला होता आणि ती 14 आठवडे शोमध्ये होती.
शहबाज बदेशा सुद्धा 'बिग बॉस 19' मधून बाहेर
अशनूरनंतर शहबाज बदेशा सुद्धा घराबाहेर पडल्याची बातमी येत आहे. बिग बॉसच्या घरातील सर्वात जास्त मनोरंजन करणारा सदस्य म्हणून ओळखल्या जाणाऱ्या शहबाजने 14 व्या दिवशी शोमध्ये प्रवेश केला होता आणि 12 आठवड्यांच्या काळात आपल्या कॉमेडीने प्रेक्षकांमध्ये खास स्थान निर्माण केले होते. अशनूरप्रमाणेच शहबाजचे चाहतेही त्याच्या एलिमिनेशनला चुकीचे ठरवत आहेत.
बिग बॉस 19 ला मिळाले 5 फायनलिस्ट
अशनूर कौर आणि शहबाज बदेशa बाहेर पडताच 'बिग बॉस 19' ला पाच फायनलिस्ट मिळाले आहेत, ज्यात गौरव खन्ना, अमाल मलिक, फरहाना भट्ट, तान्या मित्तल आणि मालती चाहर यांचा समावेश आहे. 7 डिसेंबर रोजी शोचा ग्रँड फिनाले होणार आहे आणि या सीझनला त्याचा विजेता मिळेल.


