आयुष्मान खुराना आणि सारा अली खानच्या 'उडता तीर' या सिनेमाची नवी रिलीज डेट जाहीर झाली आहे. हा सिनेमा आता ९ ऑक्टोबरला प्रदर्शित होणार आहे. धर्मा प्रॉडक्शन्स आणि सिख्या एंटरटेनमेंट निर्मित हा फॅमिली एंटरटेनर सिनेमा आधी सप्टेंबरमध्ये रिलीज होणार होता.

आयुष्मान खुराना आणि सारा अली खान यांच्या 'उडता तीर' या सिनेमाला आता नवी रिलीज डेट मिळाली आहे. धर्मा प्रॉडक्शन्स आणि सिख्या एंटरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेला हा सिनेमा आता ९ ऑक्टोबरला चित्रपटगृहात दाखल होईल. याआधी हा सिनेमा सप्टेंबर महिन्यात रिलीज होणार होता. निर्मात्यांच्या मते, 'उडता तीर' हा सिनेमा "विनोद, गोंधळ आणि संपूर्ण कुटुंबासाठी एक मनोरंजक कथा" घेऊन येत आहे. या सिनेमाची कथा आणि दिग्दर्शन आकाश ए. कौशिक यांनी केलं असून, दिग्दर्शक म्हणून हा त्यांचा पहिलाच सिनेमा आहे. करण जोहर, अदर पूनावाला, अपूर्व मेहता, गुनीत मोंगा कपूर आणि अचीन जैन हे या सिनेमाचे निर्माते आहेत.

या सिनेमाच्या निमित्ताने सारा आणि आयुष्मान 'पती पत्नी और वो दो' नंतर पुन्हा एकदा एकत्र दिसणार आहेत. या सिनेमात रकुल प्रीत सिंग आणि वामिका गब्बी यांच्याही भूमिका आहेत. विशेष म्हणजे, २०१९ मध्ये आलेला 'पती पत्नी और वो' हा सिनेमा १९७८ सालच्या याच नावाच्या सिनेमाचा रिमेक होता. त्यात कार्तिक आर्यन, भूमी पेडणेकर आणि अनन्या पांडे मुख्य भूमिकेत होते. त्या सिनेमात आयुष्मान खुरानाचा भाऊ अपारशक्ती खुराना एका महत्त्वाच्या भूमिकेत दिसला होता.

आयुष्मानचे आगामी सिनेमे

येत्या काही महिन्यांत आयुष्मान सूरज बडजात्या यांच्या 'ये प्रेम मोल लिया' या सिनेमातही दिसणार आहे. राजश्री प्रॉडक्शन्स आणि महावीर जैन फिल्म्स मिळून या सिनेमाची निर्मिती करत आहेत. यात आयुष्मान खुरानासोबत शर्वरी मुख्य भूमिकेत आहे. या सिनेमाची घोषणा याच वर्षी एप्रिल महिन्यात करण्यात आली होती. 'प्रेम रतन धन पायो' नंतर संगीतकार हिमेश रेशमिया पुन्हा एकदा बडजात्यांसोबत या सिनेमासाठी काम करत आहे.