बॉलिवूड अभिनेता गोविंदा यांची पत्नी सुनीता आहुजा यांचा एक भावुक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे, ज्यामध्ये त्या रडताना दिसत आहेत. त्यांनी आपल्या आयुष्यातील कठीण प्रसंगांबद्दल आणि जवळच्या लोकांबद्दल सावधगिरीचा इशारा दिला आहे.

बॉलिवूड अभिनेता गोविंदाच्या बायकोचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. त्याची बायको सुनीता या व्हिडिओमध्ये रडताना दिसून आली आहे. युट्युबवर पदार्पण केलेल्या गोविंदाच्या बायकोने आयुष्य खूप कठीण चाललं असल्याचं सांगितलं आहे. तिने यावेळी बोलताना आपल्या जवळच्या आणि परक्या लोकांना सावधगिरीचा इशारा दिला आहे.

आयुष्यात सुखाच्या मागे दुःख येत असतात. आपण खूप सुखी असलो की दुःख आणि खूप दुःखी असलो की सुख हे ठरलेलं असत. आपल्याला जवळच्या लोकांचा खरा चेहरा हा दुःखाच्या वेळेस दिसत असतो. गोविंदा आणि सुनीता आहूजा यांच्या नात्यात काही काळापासून तणाव असल्याच्या बातम्या आहेत. दोघेही वेगवेगळे राहतात.

सुनीता आहुजा यांची ब्लॉगर म्हणून नवीन ओळख 

सुनीता आहुजा या फक्त गोविंदाची पत्नी नसून ब्लॉगर म्हणून त्यांची ओळख तयार झाली आहे. ब्लॉगमध्ये त्यांनी बोलताना म्हटलं आहे की, “आयुष्य खूपच कडू झालं आहे…” आपल्या पहिल्या ब्लॉगमध्ये ती चंदीगडच्या जंगलात असलेल्या महाकाली माता मंदिरात पोहोचली होती. तिने सांगितलं की या मंदिराबद्दल फार कमी लोकांना माहिती आहे, त्यामुळे इथे गर्दी कमी असते.

YouTube video player

चंदीगढच्या या मंदिराबद्दल फार कमी लोकांना माहिती 

तिने सांगितलं की ती महाराणीची भक्त आहे आणि कोणी चुकीचं बोललं तर तिला खूप राग येतो, कारण ती न्यायप्रिय आहे. मंदिरातील पुजाऱ्याशी संवाद करताना तिने हे सांगितलं, त्यावर पुजारी म्हणाला — “जो खरा असतो त्याला राग पटकन येतो.” ती लहानपणापासून मुंबईतील महालक्ष्मी मंदिरात जात असायची, याबद्दलचा उल्लेख तिने बोलताना केला आहे.