कॉमेडियन प्रणित मोरेच्या स्टॅन्ड अप शोमध्ये हिमांशू जांगरा नावाच्या तरुणाने डेटिंगवर ₹370 खर्च करून बिर्याणी खाऊ घातल्याचा किस्सा सांगितला. त्याच्या या वक्तव्यानंतर सोशल मीडियावर एकच खळबळ उडाली असून, हा व्हिडीओ प्रचंड व्हायरल झाला आहे, ज्यामुळे त्याच्या आयुष्यात मोठे बदल झाले आहेत.

कॉमेडियन प्रणित मोरे हा कायमच चर्चेत राहत असतो. एका स्टॅन्ड अपशोच्या दरम्यान तरुणाने सांगितलेल्या एका घटनेवरून धुमाकूळ उडाला आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण देशात एकच खळबळ उडाली आहे. यावेळी आता बिर्याणीच्या प्रकरणावरून हा वाद झाल्याचं सांगण्यात आलं आहे. नेमकं काय झालं, तेच आपण आता जाणून घेणार आहोत.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

नेमक काय झालं? 

आपण यावेळी बिर्याणीबद्दल वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. कॉमेडियन प्रणित मोरे यांच्या शोमध्ये हिमांशू जांगरा नावाच्या तरुणाने डेटिंगशी संबंधित एक प्रसंग सांगितला. त्याने एका मुलीवर ३७० रुपये खर्च करून बिर्याणी खाऊ घातल्याचा उल्लेख केला होता. त्यानंतर केलेल्या काही टिप्पणींमुळे सोशल मीडियावर अनेकांनी त्याच्या वक्तव्यावर आक्षेप घेतला.

सोशल मीडियावर संतापाची लाट 

यावेळी व्हिडीओ व्हायरल होताच सोशल मीडियावर संतापाची लाट दिसून आली आहे. यावरून अनेकांनी मत मतांतरे वक्तव्य केलं आहे. काहींनी या तरुणाच्या बाबत विनोदी भूमिका घेतली असून काहींनी यावर वेगळं मत वक्तव्य केलं आहे. यावरून ट्विटरवर लोकांनी मत मांडली आहेत.

नेटिझन्स काय म्हणाले? 

यावेळी बोलताना नेटिझन्सने त्याला ट्रोल केले आहे. काहींनी त्याला बोलायची संधी दिली नाही, ३७० रुपयांच्या बिर्याणीचा वाद आता सगळीकडे दिसून आला आहे. काही सेकंदांच्या व्हिडिओमुळे एखाद्याचे आयुष्य किती बदलू शकते, याचे हे ताजे उदाहरण मानले जात आहे.