Relationship Crime Story: शारीरिक संबंध ठेवण्यापूर्वी ती विचित्र सूचना द्यायची. संबंधानंतर तिला रॅशेस आल्यावर तिने STI चा आरोप केला. त्यामुळे राग अनावर होऊन हत्या केली. हा जबाब खुनी प्रियकराचा आहे.
US Boy Killed Chinese GF : आजच्या काळात प्रेमाची व्याख्या बदलली गेली आहे. गर्लफ्रेंड आणि बॉयफ्रेंड बनून भावनेऐवजी मुलं-मुली फक्त शारीरिक गरजा पूर्ण करण्याचा प्रयत्न करतात. पण अनेकदा हेच गुन्हेगारीचे कारण बनते. जसे या प्रकरणात घडले. अमेरिकेचा एक विद्यार्थी लंडनमध्ये त्याच्या चीनी गर्लफ्रेंडच्या हत्येप्रकरणी दोषी आढळला आहे. हत्येचे कारण तुम्हाला आजच्या नात्यांमधील सत्यता दाखवून देईल. नक्की काय घडले आणि काय आहे प्रकरण जाणून घेऊया.
लंडनच्या गोल्डस्मिथ्स युनिव्हर्सिटीमध्ये शिकणारा एक श्रीमंत अमेरिकन विद्यार्थी, जोशुआ माइकल्स (Joshua Michals) हा त्याची गर्लफ्रेंड झे वांगच्या हत्येप्रकरणी दोषी आढळला आहे. 2024 मध्ये माइकल्सने वांगच्या लंडनमधील फ्लॅटवर चाकूने हल्ला करून तिची हत्या केली. ही घटना तेव्हा घडली जेव्हा वांगने त्याच्यावर लैंगिक संक्रमित संसर्ग (STI) दिल्याचा आरोप केला होता.
6 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते, एकदाच ठेवले शारीरिक संबंध
पोलिसांच्या तपासादरम्यान माइकल्सने केलेला खुलासा धक्कादायक होता. त्याने सांगितले की तो आणि वांग 6 महिन्यांपासून रिलेशनशिपमध्ये होते. वांगला जर्मोफोबिया (germophobia) होता. त्यामुळे त्यांनी फक्त एकदाच शारीरिक संबंध ठेवले. प्रियकराने पुढे सांगितले की, त्याची गर्लफ्रेंड स्वच्छतेबाबत कसे निर्देश द्यायची.
स्वच्छतेबाबत गर्लफ्रेंड द्यायची अनेक निर्देश
वांग त्याच्या सोफ्यावर बसण्यापूर्वी तो निर्जंतुक करायची, त्याचे घर स्वच्छ करायची आणि सेक्सपूर्वी घरात कसे प्रवेश करायचे, शरीर कसे धुवायचे, कंडोम कधी घालायचा इत्यादी अनेक प्रकारचे निर्देश द्यायची.
रॅशेस ठरले वादाचे कारण
पहिल्यांदा संबंध ठेवल्यानंतर वांगला रॅश आली आणि तिने माइकल्सला पुन्हा चाचणी करण्यास सांगितले. माइकल्सने नकार दिल्यावर वांगने त्याचे आयुष्य उद्ध्वस्त केल्याचा आरोप केला आणि विद्यापीठात तक्रार करण्याची धमकी दिली. हत्येच्या दिवशी माइकल्स वांगच्या घरी वाद मिटवण्यासाठी गेला होता, पण भांडण वाढले. माइकल्सने दावा केला की वांगने त्याच्यावर चाकूने हल्ला केला, त्यानंतर दोघांमध्ये झटापट झाली. ऑटोप्सी रिपोर्टमध्ये वांगचा मृत्यू डोक्यावर चाकूचा वार आणि गळा दाबल्याने झाल्याची पुष्टी झाली.
कोण आहे माइकल्स?
अभियोजन पक्षाच्या म्हणण्यानुसार, जर माइकल्सने वांगवर हल्ला केल्यानंतर लगेच रुग्णवाहिका बोलावली असती आणि वकिलासाठी वडिलांना फोन केला नसता, तर वांगचा जीव वाचू शकला असता. शिकागो (इलिनॉय) येथे जन्मलेल्या आणि वाढलेल्या माइकल्सने अमेरिकेत फिल्ममेकिंगचे शिक्षण घेतले आणि लंडनला येऊन गोल्डस्miths मध्ये एका वर्षाची मास्टर डिग्री करत होता. वांग गोल्डस्miths मध्ये क्रिएटिव्ह रायटिंगची विद्यार्थिनी होती. दोघांची भेट कॅम्पसमध्ये झाली होती आणि 2023 मध्ये त्यांचे ऑन-ऑफ रिलेशनशिप सुरू झाले होते.


