रेडिटवर एक फोटो व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एका थार गाडीला गर्दीने घेरलेलं दिसत आहे. थार चालकाने ब्लिंकिटच्या डिलिव्हरी बॉयला मारहाण केली, त्यानंतर संतापलेल्या लोकांनी थार चालकालाच चोप दिला.

रेडिटवर शेअर झालेला एक फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. या फोटोच्या कमेंट सेक्शनमध्ये लोकांच्या प्रश्नांचा पाऊस पडलाय. नेमकं काय घडलंय, हे जाणून घेण्याची सर्वांनाच उत्सुकता होती. ज्या युजरने हा फोटो पोस्ट केलाय, त्यानेच यामागची कहाणी सांगितली. थार चालकाने आधी एका डिलिव्हरी बॉयला मारहाण केली. त्यानंतर तिथे जमलेल्या गर्दीने थार चालकालाच चांगला चोप दिला.

इंटरनेटवर एवढी माहिती मिळताच लोकांनी यावर चर्चा सुरू केली आणि पोस्ट व्हायरल झाली. आतापर्यंत या प्रकरणाची फार कमी माहिती समोर आली असली, तरी प्रकरण गंभीर असल्याचं दिसतंय.

या फोटोमध्ये थार गाडीच्या आजूबाजूला मोठी गर्दी जमलेली दिसत आहे. थार चालकाने ब्लिंकिट (Blinkit) डिलिव्हरी बॉयला एकटा समजून त्याच्यावर हात उगारला. पण त्याचा हाच निर्णय त्याच्या अंगलट आला आणि लोकांनी त्यालाही सोडलं नाही.

कमेंट सेक्शनमध्ये युजर्स भन्नाट प्रतिक्रिया देत आहेत. एका युजरने लिहिलं, "जिथे थार असते, तिथे काहीतरी राडा ठरलेलाच असतो." दुसरा म्हणाला, "काहीही म्हणा, आपल्या देशातल्या लोकांकडे खूप रिकामा वेळ आहे." तिसऱ्याने कमेंट केली, "आज या थार वाल्याला समजलं असेल की कुठेही, कोणाच्याही नादाला लागायचं नसतं." तर चौथ्या युजरने लिहिलं, "काही छपरी थार मालकांमुळे ही गाडी आता फालतू गाड्यांच्या यादीत सामील होत आहे."

View post on Instagram
 

रस्त्यावरचा राडा असो वा जेसीबीचं खोदकाम, सोशल मीडियावर असे विषय नेहमीच लोकांचं लक्ष वेधून घेतात. पण एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की, रोड रेजच्या (Road Rage) प्रकरणांमध्ये पोलीस अनेकदा कडक कारवाई करतात आणि आरोपी थेट अडचणीत येतात.

नुकतंच गुरुग्राम (Gurugram) च्या रस्त्यांवर सिया नावाच्या एका रायडरला कारने धडक दिली होती. गुरुग्राम पोलिसांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेत एफआयआर (FIR) नोंदवला आणि आरोपीला अटक केली.