बीडमधील उमा किरण शैक्षणिक संकुलात शिक्षकांवर विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याचा आरोप झाला आहे. दोन वर्षांपूर्वीही असाच प्रकार घडल्याची तक्रार असूनही कारवाई झालेली नाही. शिक्षकांनी केबिनमध्ये बोलावून विद्यार्थिनींना अश्लील स्पर्श केल्याचा आरोप आहे.
बीड जिल्हा काही महिन्यांपासून परत चर्चेत आला आहे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर येथे एक खळबळजनक घटना घडली. गुरु आणि शिष्याच्या नात्याला काळीमा फासणारी ही घटना उमा किरण शैक्षणिक संकुलामध्ये घडली होती. आरोपी शिक्षक विजय पवार आणि प्रशांत खाटोकर यांना याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. केबिनमध्ये बोलवत विद्यार्थिनींचा विनयभंग केला जात होता, असा आरोप या दोघांवर करण्यात आला.
परत केला आरोप
आता परत एकदा नवीन विद्यार्थिनीने शिक्षकांनी आपल्या सोबत विनयभंग करण्याचा प्रयत्न केला असं म्हटलं आहे. विजय पवार संचालक असलेल्या एका शाळेत अशाच पद्धतीने दोन वर्षांपूर्वी अशी घटना घडल्याची तक्रार करण्यात आली होती. या प्रकरणात पालकांनी दोन वर्षापासून पाठपुरावा करूनही अद्याप कारवाई झाली नाही.
पालकांनी केला गंभीर आरोप
विजय पवार यांनी माझ्या मुलीवर अत्याचार केला आहे. शिक्षण अधिकाऱ्यांकडे दोन वर्षांपूर्वी तक्रार केलेली. माझ्या मुलीला शाळेच्या बाहेर ठेवलेलं. केबिनमध्ये बोलावत बॅट टच केलं होतं. मुलीने माझ्या पत्नीला सांगितलं, आरोपी शिक्षक खांद्यावर टाकायचा, गालावर हात फिरवायचा आणि माफी मागावी असं तिला सांगितलं, मला न्याय मिळायला हवा असं पिढी पालकांनी सांगितला आहे.
विद्यार्थिनी काय म्हणाली?
मला केबिनमध्ये कोणी नसताना अंगाला स्पर्श करायचे, सर्व मुलं दुसऱ्या क्लासला गेले की दुसऱ्या बाजूला बोलवायचे आणि एकटीला थांबून ठेवायचे. तेव्हा सर्व क्लास मधील मुले माझ्याकडे वाईट नजरेने बघायचे. त्यावेळी मला सरांनी धमकी दिली होती की जर हे काय घरी काही सांगितलं तर मारून टाकेल, असं विद्यार्थिनी म्हटला आहे.