सार
पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात महिलेवर करण्यात आलेल्या बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्तात्रेय गाडेला अखेर पोलिसांनी अटक केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांकडून ड्रोनच्या माध्यमातून त्याचा शोध घेतला जात होता.
Pune Rape Case Accused Arrested : पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात महिलेवर करण्यात आलेल्या बलात्काराच्या प्रकरणात पोलिसांना मोठे यश आले आहे. 37 वर्षीय आरोपी दत्तात्रेय रामदास गाडे याला पुण्यातील शिरूर तालुक्यातून अटक करण्यात आली आहे. असे सांगितले जात आहे की, गाडे रात्री उशिरा कोणाच्यातरी घरी जेवणासाठी गेला होता. याच व्यक्तीने पोलिसांना आरोपीबद्दल माहिती दिली. पोलिसांनी गुरुवारी (27 फेब्रुवारी) रात्री 1.30 वाजताच्या सुमारास आरोपी दत्तात्रेय गाडेला अटक केली. आज आरोपीला पुणे कोर्टासमोर हजर केले जाणार आहे.
आरोपी गाडेवर आधीपासून काही गुन्हे दाखल होते. वर्ष 2019 पासून गाडे जामीनावर बाहेर आला होता. महिलेवर बलात्कार केल्याच्या घटनेनंतर दोन दिवस आरोपी दत्तात्रेय गाडे बेपत्ता होता. यानंतर पोलिसांकडून आरोपीचा शोध घेण्यासाठी 13 विशेष पथके तयार करण्याच आली होती. या प्रकरणात पुणे पोलिसांनी आरोपीची माहिती देणाऱ्याला एक लाख रुपयांचे बक्षीस जाहीर केले होते.
नक्की काय घडले?
पीडित महिला मंगळवारी (25 फेब्रुवारी) सकाळी 5.45 मिनिटांनी फलटण, साताऱ्यासाठी जाणाऱ्या बसची वाट पाहत होती. त्यावेळी एक व्यक्ती तिच्याकडे येत तिला ताई म्हणाला. या व्यक्तीने साताऱ्यासाठीची बस दुसऱ्या प्लॅटफॉर्मवर आली असल्याचे सांगितले.
यानंतर आरोपीने पीडित तरुणीला शिवशाही एसी बसमध्ये नेले. बसमधील लाईट्स बंद होत्या. पीडित तरुणी बसमध्ये चढण्यास घाबरत होती तरीही आरोपीने तिला चढण्यास सांगितले आणि त्याचवेळी बलात्कार केला. बलात्कारानंतर आरोपीने घटनास्थळावरुन पळ काढला.
आणखी वाचा :
पुण्यातील बलात्कार प्रकरणावरुन वडेट्टीवारांनी राज्यातील कायदा व सुव्यवस्थेवर केली टीका