Palghar Crime : सोशल मीडियावर मैत्री आणि...15 वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्काराने महाराष्ट्र हादरला

| Published : May 08 2024, 10:12 AM IST

rape 1.jp

सार

Crime : पालघरमधील 15 वर्षीय मुलीवर सामूहिक बलात्कार केल्याच्या घटनेने महाराष्ट्र हादरला आहे. नक्की काय घडले याबद्दल जाणून घेऊया सविस्तर....

Crime News : महाराष्ट्रातील पालघर जिल्ह्यात एका अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या प्रकरणातील आरोपींनी पीडित मुलीशी सोशल मीडियावर मैत्री केली. यानंतर तिला आपल्या घरी बोलावून सामूहिक बलात्कार केला. या प्रकरणातील दोन आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे.

पोलिसांनी घटनेची दिली माहिती
पालघर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित मुलीचे वय 15 वर्ष आहे. या प्रकरणातील दोन्ही आरोपी 20 वर्षांचे आहेत. यासंबंधित एका पोलीस अधिकाऱ्यांनी घटनेची सविस्तर माहिती देत पीटीआयला सांगितले की, आरोपींनी पीडित मुलीसोबत इंस्टाग्रामवर मैत्री केली होती. यानंतर 30 एप्रिलला आरोपीने पीडित मुलीला आपल्या घरी बोलावत तेथे बलात्कार केला.

यानंतर 4 मे ला दोन्ही आरोपींनी वेगवेगळ्या ठिकाणी मुलीवर काहीवेळा सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलगी घरी परतली असता तिची अवस्था पाहून घरातील मंडळींना धक्का बसला. अशातच पीडित मुलीने तिच्यासोबत घडलेला सर्व प्रकार घरच्यांना सांगितला.

आरोपींच्या विरोधात गुन्हा दाखल
पालघर जिल्हा ग्रामीण पोलिसांनी पीडितेने दिलेल्या माहितीनुसार आरोपींच्या विरोधात आयपीसी कलम 376 आणि पोक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल केला. यानंतर आरोपींना तलासरी येथून अटक करण्यात आली.

आरोपी बनावट नावांचा करायचे वापर
दोन्ही आरोपी आपली ओखळ लपवण्यासाठी बनावट नावांचा वापर करायचे. पण गुप्त आणि तांत्रिक माहितीच्या आधारावर पोलिसांनी दोघांना अटक करण्यात आल्याची माहिती घटनेत तपास करत असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे. या दोन्ही आरोपींना कोर्टासमोर हजर करण्यात आल्यानंतर 9 मे पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. सध्या प्रकरणात अधिक तपासही केला जात आहे.

आणखी वाचा : 

महाविद्यालयातील 18 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार, मृत्यूआधी पीडितीने सांगितली स्वत:सोबत घडलेली भयंकर स्थिती

टॅक्सी चालकाकडून महिलेची गळा दाबून हत्या, पोलिसांनी अवघ्या 24 तासात असा लावला गुन्ह्याचा छडा