Crime News : धक्कादायक ! ग्रेटर नोएडा येथील विद्यापीठाच्या पाण्याच्या टाकीत सापडला महिलेचा मृतदेह

| Published : May 07 2024, 11:14 AM IST

muder 000

सार

ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठाच्या एम हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे.सदर महिला फ्लॅटमध्ये पती आणि सासूसोबत राहत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. 

ग्रेटर नोएडा येथील गौतम बुद्ध विद्यापीठाच्या एम हॉस्टेलच्या तिसऱ्या मजल्यावरील पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. माहिती मिळताच इकोटेक 1 पोलिस स्टेशनचे एसीपी, कायदा आणि सुव्यवस्था डीसीपी आणि अतिरिक्त डीसीपीचे पथक घटनास्थळी पोहोचले असून पुढील प्रकरणाचा तपास सुरू केला आहे . सदर महिला फ्लॅटमध्ये पती आणि सासूसोबत राहत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे. रात्री उशिरा कुटुंबात भांडण झाले.त्यानंतर महिलेची हत्या केल्यानंतर दोघेही घटनास्थळावरून पळून गेल्याचा पोलिसांना संशय आहे.पती आणि सासू फरार असून त्यांच्या शोध घेण्यासाठी पोलिसांचे पथक तयार करण्यात आले आहे.

विद्यापीठाच्या होस्टेलच्या टाकीत महिलेचा मृतदेह सापडला आहे. एसीपी कायदा व सुव्यवस्था शिवहरी मीना यांनी सांगितले की, गौतम बुद्ध विद्यापीठच्या एम वसतिगृहाच्या छतावर बांधलेल्या सिमेंटच्या पाण्याच्या टाकीत एका महिलेचा मृतदेह असल्याची माहिती पीआरव्ही कंट्रोलकडून मिळाली होती. माहिती मिळताच इकोटेक-१ पोलीस ठाण्याचे प्रभारी पथकासह घटनास्थळी दाखल झाले त्यांनतर त्यांनी पुढील तपास सुरु केला आहे.

पोलिसांनी या प्रकरणावर काय सांगितले :

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, महिलेचा पती जिम्स हॉस्पिटलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता.तो पत्नी आणि आईसोबत फ्लॅटमध्ये राहत होता. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, सोमवारी रात्री 3 वाजेपर्यंत पती-पत्नीमध्ये काही कारणावरून भांडण सुरु होते आणि ते एकमेकांशी अनेकदा भांडत होते. तेव्हापासून मृत महिलेचा पती घटनास्थळावरून फरार आहे.मृत महिलेच्या नातेवाईकांच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून मृतदेहाचा पंचनामा करून तो शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे . फरार आरोपींना पकडण्यासाठी एक पथक तयार करण्यात आले असून कसून तपास सुरू आहे. लवकरच या घटनेचा उलगडा करण्यात येईल असे पोलिसांनी सांगितले आहे.

त्यांच्यात नेहमी भांडण व्हायची :

महिलेचा पती जिम्स हॉस्पिटलमध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होता.तो पत्नी आणि आईसोबत फ्लॅटमध्ये राहत होता. आजूबाजूच्या लोकांनी सांगितले की, सोमवारी रात्री 3 वाजेपर्यंत पती-पत्नीमध्ये काही कारणावरून भांडण सुरु होते आणि ते एकमेकांशी अनेकदा भांडत होते.

आणखी वाचा :

Punjab Crime News : गुरुद्वारा 'अपवित्र' केल्याच्या आरोपावरून जमावाने असे काही केले की, तरुणाचा मृत्यू झाला