सार

बेंगळुरू मध्ये अंत्यत धक्कादायक प्रकार घडला आहे.मित्र मुरलीने सुरुवातीला ब्लो-ड्रायरची नोझल योगेशच्या चेहऱ्यावर आणि त्यानंतर गुदाशयात टाकण्याचा प्रयत्न केला. परिणामी योगशाचा मृत्यू झाला आहे.

बेंगळुरू मध्ये मित्रत्वाच्या नात्याला काळिमा फासण्याचे काम एका मित्राने केले आहे. मुरली नावाच्या एक मुलाने ब्लो ड्रायरची नोझल मनोरंजन म्हणून गुदाशयात घातल्याने दुसऱ्या मित्राचा मृत्यू झाला आहे. हा संपूर्ण प्रकार गुरुवारी उघडकीस आला असून पोलीस पुढील तपास करत असल्याचे सांगितले.

25 मार्च रोजी पीडित योगेश ( वय 24) हा त्याचा मित्र मुरली (वय 25) याला भेटण्यासाठी बेंगळुरूच्या सॅम्पीगेहल्ली भागातील बाईक सर्व्हिस सेंटरमध्ये गेला होता. मुरलीच्या हातात त्यावेळी ब्लो ड्रायर होते. आधी त्याने मजाक म्हणून चेहऱ्यावर फिरवलं. योगेशलाही वाटलं गम्मत आहे म्हणून तो देखील काहीही बोलला नाही. नंतर मुरले डायरेक्ट ब्लो ड्रायर गुदाशयात घातले. ब्लो ड्रायर वाफ खूप जोरात असल्याने तो जमिनीवर कोसळला. अचानक घडलेल्या या प्रकारामुळे मुरली देखील गोंधळून गेला त्याने तातडीने योगेशला रुग्णालयात दाखल केले. मात्र त्याचा उपचार दरम्यान मृत्यू झाला.

डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार ब्लो ड्रायर वाफ खूप जोरात त्याच्या आतड्याना जखमा झाल्या या इंटर्नल जखमांचे प्रमाण जास्त असल्याने त्याचा मृत्यू झाला आहे. योगेशच्या मृत्यू प्रकरणी मुरलीवर भारतीय दंड संहितेनुसार कमल 304अंतर्गत संपीगेहल्ली पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून मुरलीला अटक करण्यात आली आहे.

आणखी वाचा :

Crime : जेवण व्यवस्थितीत न बनवल्याने पती-पत्नीकडून वयोवृद्ध आजीला मारहाण, कपलला पोलिसांकडून अटक

Crime : ठाण्यातील नागरिकावर चीनमध्ये हल्ला, बनावट कॉल सेंटरमध्ये काम करण्यास दिला होता नकार

Crime : मावळ येथील अल्पवयीन मुलीवरील बलात्कार प्रकरण, कोर्टाने आरोपीला सुनावली फाशीची शिक्षा