Crime : लग्नाचे वचन देऊन महिलेवर बलात्कार आणि परिवाकडून हुड्यांची मागणी, पीडितेकडून पोलिसांत गुन्हा दाखल

| Published : Jun 13 2024, 10:46 AM IST / Updated: Jun 13 2024, 11:10 AM IST

shocking crime stories

सार

मुंबईतील वरळी पोलिसांनी एका व्यक्तीसह त्याची बहीण आणि घरातील मंडळींवर गुन्हा दाखल केला आहे. खरंतर, महिलेला वचन देऊन तिच्यावर बलात्कार आणि परिवाराने हुंड्यांची मागणी केल्याचे पीडित महिलेने आपल्या तक्रारीत म्हटले आहे.

Crime : वरळी येथील पोलीस स्थानकात एका पीडित महिलेले आरोपी व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. खरंतर, व्यक्तीने पीडित महिलेला साखरपुड्यानंतर लग्नाचे वचन देत तिच्यावर बलात्कार केला. याशिवाय आरोपीच्या घरातील मंडळींनी पीडित महिलेच्या परिवाराकडे हुंड्यांची मागणीही केली. अशातच आरोपीसह त्याच्या घरातील मंडळींच्या विरोधात पीडित महिलेने पोलिसात धाव घेत तक्रार दाखल केली. या प्रकरणात आणखी एक धक्कादायक खुलासा असा झालाय की, आरोपीचे आधीच लग्न झाले होते.

नक्की काय आहे प्रकरण?
वरळी पोलिसांनी प्रकरणाबद्दल अधिक माहिती देत सांगितले की, मध्य प्रदेशातील एक 39 वर्षीय महिलेने उज्वल गोनेका नावाच्या व्यक्तीसोबत वर्ष 2017 मध्ये साखरपुडा केला. यानंतर लग्न करु असे वचन देत पीडित महिलेवर बलात्कार केला. पीडित महिलेने तक्रार दाखल करत म्हटले की, गोनेकाची बहीण आणि घरातील मंडळी त्याच्यासोबत लग्न न करण्यासाठी दबाव टाकू लागली. पण मी घरातल्यांच्या विरोधात जाऊन तुझ्याशीच लग्न करेन असेही पीडिताने सांगितले.

गोनेकाच्या परिवाराचे आरोप
पोलीस अधिकाऱ्यांनी पुढे म्हटले की, गोनेकाच्या परिवाराने पीडित महिलेच्या घरातील मंडळींवर काही आरोप लावले आहेत. गोनेकाच्या मंडळींनी म्हटले की, महिलेच्या घरातील मंडळींनी साखरपुड्यावेळी त्यांच्याशी व्यवस्थितीत वागणूक केली नाही. गोनाका परिवाराचा लग्नासाठी पूर्णपणे नकार होता. पण आरोपीने पीडित महिलेला काहीही झाले तरीही लग्न करु असे वचन दिले होते. याच दरम्यान, गोनेकाच्या परिवाराने नऊ सोन्याची नाणी देण्याची मागणी केलीय.

वर्ष 2017 पासून दिलेले लग्नाचे वचन
उज्वल गोनेकाने महिलेला वर्ष 2017 पासून ते आतापर्यंत केवळ लग्नाचे वचनच दिले होते. या दरम्यान, दोघांमध्ये शारिरीक संबंधही होते. जून महिन्यात तक्रार केल्यानंतर गोनेकाचे दुसऱ्याशी लग्न झाल्याचे समोर आले. अशातच पीडित महिलेने वरळी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल केला आहे.

आणखी वाचा : 

क्लास वन ऑफिसर सून निघाली खुनी, सुपारी देऊन सासऱ्याची केली हत्या; खून अपघात वाटावा यासाठी 1.76 लाखांची जुनी कार केली खरेदी

फेसबुकवर शेअर केलेल्या बनावट ट्रेडिंग पोर्टलमुळे नागपूरच्या एका व्यक्तीने 10 दिवसांत 87 लाख गमावले