भांडुपमध्ये डेटिंगवरून झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्या मैत्रिणीला इमारतीवरून ढकलून दिल्याची धक्कादायक घटना घडली आहे. मुलीने आत्महत्या केल्याचे सांगितले गेले, पण पोलिसांच्या तपासात मुलाचा गुन्हा उघड झाला.

Mumbai: डेटिंग करण्याचे प्रमाण सध्याच्या काळात मोठ्या प्रमाणावर वाढलं आहे. मुंबईतील भांडुपमध्ये एका घटनेने वातावरण ढवळून निघालं आहे. डेटिंगवरून झालेल्या वादातून अल्पवयीन मुलाने त्याच्या अल्पवयीन मैत्रिणीला इमारतीवरून ढकलून दिलं. मैत्रिणीनं आत्महत्या केल्याचं सांगितल्यावर पोलिसांच्या संशयाची सुई मित्राकडे वळली. सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केल्यावर अल्पवयीन मुलाला अटक करण्यात आली आहे.

आरोपी बालसुधारगृहात होता - 

आरोपी मुलगा अल्पवयीन असल्यामुळं त्याला बालसुधारगृहात ठेवण्यात आलं होत. भांडुप येथील महिंद्रा स्प्लेंडर सोसायटीमध्ये ही दुर्घटना घडली. अल्पवयीन मुलगी ही तिच्या आईसोबत राहत होती. ती मित्राला भेटायला भांडुप येथे २४ जून रोजी आली होती. आरोपी मुलाने तिला डी विंग इमारतीच्या सर्वात वर घेऊन गेला. तिथं गेल्यानंतर दोघांमध्ये वाद झाला.

वाद झाल्यानंतर मुलाने मुलीला वरून खाली फेकून दिले. मुलगी इमारतीवरून खाली पडल्यामुळं गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिचा त्याच अवस्थेत मृत्यू झाला. घटनेनंतर मुलगा घाबरला होता पण नंतर काही झालंच नसल्याचा बनाव त्यानं केला. त्याच अवस्थेत मुलगा घरी आला आणि मुलीनं अभ्यासाच्या तणावातून आत्महत्या केली असं त्यानं सांगितलं.

मुलाने गुन्ह्याची दिली कबुली 

मात्र पोलिसांच्या तपासात सर्व माहिती लक्षात आली आणि मुलाला अटक करण्यात आली. मुलीची आत्महत्या आहे असं समजल्यानंतर पोलिसांच्या तपासाला वेग आला. त्यांनी त्या ठिकाणी जाऊन मुलीच्या मृतदेहाला पोस्टमार्टम करण्यासाठी पाठवून दिलं. त्यानंतर मुलाच्या वडिलांच्यासमक्ष त्याची चौकशी केल्यानंतर आपणच तिला ढकलून दिल्याचं त्यानं कबूल केलं.

मुलाच्या हालचाली पोलिसांना संशयास्पद वाटल्या. त्यानंतर दोघांच्या मोबाईलची तपासणी करण्यात आली, आजूबाजूच्या लोकांकडे या घटनेची चौकशी केल्यावर दोघांमध्ये भांडण झालं होत आणि त्यातच मुलीला ढकलून दिल्याचं नंतर मुलानं कबूल केलं.