नालासोपारा येथे एका बिल्डरने पोलिसांच्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली. कर्जाच्या बदल्यात फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करून घेतल्यामुळे पोलिसांकडून त्याला धमक्या दिल्या जात होत्या, असा आरोप त्याच्या कुटुंबीयांनी केला आहे.

सध्याच्या काळात पोलिसांकडून व्यावसायिकांना आणि सामान्य लोकांना त्रास देण्याच्या घटनांमध्ये दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. नालासोपारा येथे पोलिसांच्या त्रासाला कंटाळून एका बिल्डरने आत्महत्या केली आहे. त्यानं लिहिलेल्या सुसाईड नोटवरून याबाबतची माहिती समजली आहे. जयप्रकाश या बिल्डरच्या कुटुंबाने दोन पोलिसांवर आरोप केले आहेत.

कर्जाच्या बदल्यात फ्लॅटच रजिस्ट्रेशन केलं होतं 

जयप्रकाश याने बिल्डिंग बांधण्यासाठी ३३ लाखांचं कर्ज घेतलं होत. या कर्जाच्या बदल्यात चार फ्लॅटचे रजिस्ट्रेशन करून घेण्यात आलं होत. पोलिसांकडून हे रजिस्ट्रेशन झाल्यामुळं खळबळ उडाली आहे. वेळेआधीच या कर्जाची परतफेड करा असं सांगितल्यामुळं जयप्रकाश हा बिल्डर टेन्शनमध्ये होता. शाम शिंदे, आणि राजेश महाजन आणि त्यांचा दलाल लाला लजपत यांच्याकडून धमक्या येत असल्याचा दावा चौहान यांनी केला होता.

पोलिसांकडून देण्यात आली माहिती 

बिल्डर जयप्रकाश चौहान याच्या आत्महत्या प्रकरणी त्याच्या मुलीने दिलेल्या माहितीनुसार तक्रार दाखल करण्यात आली आहे. शाम शिंदे या व्यक्तीचा मुलीला फोन आला होता, त्यावेळी बोलताना "तुझे वडील फोन उचलत नाहीत, त्यांना सांग माझे पैसे द्यायला सांग, नाहीतर जेलमध्ये टाकेन " असं मुलीनं सांगितलं आहे. सुसाईड नोटमधील माहितीवरून आणि प्रत्यक्ष पुराव्यांच्या आधारे योग्य कारवाई करण्यात येईल असं पोलिसांनी म्हटलं आहे.