मुंबईत सैमलैंगिक रिलेशनशिपमध्ये असणाऱ्या एका पार्टरकडून दुसऱ्या पार्टनरची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. नक्की काय घडले याबद्दल सविस्तर जाणून घेऊया.
मुंबई : मुंबईत एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे, जिथे 19 वर्षीय तरुणाने आपल्या 16 वर्षीय एक्स बॉयफ्रेंडची विष देऊन हत्या केली आहे.किशोरवयीन दोघांमधील समलैंगिक प्रेमसंबंध तुटल्यानंतर हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे. कुटुंबीयांच्या विरोधामुळे हे नातं संपुष्टात आल्याचे सांगितले जात आहे.
आरोपी तरुणाने शीतपेयामध्ये विष मिसळून पीडित मुलाला प्यायला दिलं, ज्यामुळे तो काही वेळातच बेशुद्ध अवस्थेतबेडवर कोसळला.रुग्णालयात दाखल केल्यानंतर डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.
मृत्यू झालेला व्यक्ती आणि आरोपी यांच्यातील नात्याविषयी संभ्रम होता. मात्र तपासाअंती पोलिसांनी स्पष्ट केलं की दोघे समलैंगिक रिलेशनशिपमध्ये होते.आरोपीला अटक करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
नक्की काय घडले?
मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार, 16 वर्षीय अल्पवयीन मुलगा 29 जून रोजी फिरण्यासाठी घराबाहेर पडला, पण त्यानंतर घरी परतलाच नाही. शोधाशोध सुरू झाल्यानंतर मुलाच्या एका मित्राने सांगितले की, त्याला शेवटचं आरोपी तरुणाच्या घरी पाहण्यात आलं होतं.
कुटुंबीयांनी तत्काळ संबंधित ठिकाणी धाव घेतली असता, मुलगा बेहोश अवस्थेत बेडवर आढळून आला. त्याला तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केलं.या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे.सुरुवातीला आरोपीच्या कुटुंबीयांनी पोलिसांना सांगितलं की, दोघा मित्रांनी आपापल्या इच्छेने शीतपेय घेतलं होतं. मात्र, त्यांच्या जबाबांमध्ये सुसंगती नसल्यामुळे पोलिसांना संशय आला.
तपास अधिक खोलवर गेला असता, आरोपीने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. त्याने थंड पेयामध्ये कीटकनाशक मिसळून दिलं होतं, जे प्याल्यानंतर पीडित मुलाला उलट्या होऊ लागल्या आणि त्यातच त्याचा मृत्यू झाला.विशेष म्हणजे, आरोपीलाही उलट्या झाल्यामुळे त्याला तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं, मात्र त्याची प्रकृती स्थिर आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. काही महिन्यांपूर्वी आरोपी तरुणाने पीडित मुलाला नागपूरला नेलं होतं, ज्यामुळे मुलाच्या कुटुंबीयांनी या नात्याला तीव्र विरोध दर्शवला.
याप्रसंगानंतर पीडित मुलाने आरोपीशी संपर्क टाळण्यास सुरुवात केली, आणि हेच आरोपीला खटकलं. त्याच्या मनात नाराजी निर्माण झाली होती.मुलाच्या मित्रांनी पोलिसांना सांगितलं की, "आरोपीकडून संपर्क साधला जात असताना पीडित मुलगा तणावात दिसायचा." या घटनेमागील मानसिक तणाव आणि दडपण हळूहळू उलगडत आहे.


