सार
रांची: कसाई म्हणून काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाने झारखंडच्या खुंटी जिल्ह्यातील जंगली भागात आपल्या 'लिव्ह ईन' साथीदाराचा गळा दाबून खून केला आणि तिच्या मृतदेहाचे ४० ते ५० तुकडे केले. अशी माहिती पोलिसांनी बुधवारी दिली. नरेश भेंगरा असे आरोपीचे नाव असून त्याला अटक करण्यात आली आहे. पोलिसांनी सांगितले की, जरियागढ पोलिस ठाण्याच्या जोरदाग गावाजवळ २४ नोव्हेंबर रोजी एका भटक्या कुत्र्याजवळ मानवी शरीराचे अवयव आढळून आल्याने ही घटना हत्येच्या जवळपास पंधरा दिवसांनंतर उघडकीस आली.
भेंगरा काही वर्षांपासून खुंटी जिल्ह्यातील महिलेसोबत तामिळनाडूमध्ये 'लिव्ह इन रिलेशनशिप'मध्ये राहात होता. काही काळापुर्वी, तो झारखंडला परतला आणि आपल्या जोडीदाराला काहीही न सांगता दुसऱ्या महिलेबरोबर लग्न केले आणि त्याच्या पत्नीशिवाय तो तामिळनाडूला परत गेला. खुंटीचे पोलीस अधीक्षक अमन कुमार यांनी सांगितले की, ८ नोव्हेंबर रोजी ते दोघे खुंटीला पोहचल्यानंतर ही क्रुर घटना घडली. दुसऱ्या महिलेसोबत लग्न केलेल्या आरोपीला तिला घरी न्यायचे नव्हते. त्याऐवजी, त्याने तिला जरियागढ पोलिस ठाण्याच्या हद्दीतील जोरदाग गावाजवळील जंगलात नेले आणि मतदेहाचे तुकडे केले.
वन्य प्राण्यांना खाण्यासाठी टाकले मृतदेहाचे तुकडे
या प्रकरणाचा तपास करणारे पोलीस निरीक्षक अशोक सिंग यांनी सांगितले की, आरोपी तामिळनाडूतील एका कसाईच्या दुकानात काम करत होता आणि चिकन कापण्यात तरबेज होता. जंगल सोडण्यापूर्वी त्याने महिलेच्या शरीराचे ४० ते ५० तुकडे करून वन्य प्राण्यांना खाण्यासाठी टाकल्याचे कबूल केले. २४ नोव्हेंबर रोजी परिसरातील कुत्रा मृतदेहाच्या हातासह आढळल्यानंतर पोलिसांनी मृतदेहाचे बाकीचे भाग जप्त केले. सिंग यांनी सांगितले की, आरोपीच्या लग्नाची माहिती नसलेल्या महिलेने आरोपीवर खुंटीला परत जाण्यासाठी दबाव टाकला. रांचीला पोहोचल्यानंतर ती २४ नोव्हेंबरला रेल्वने आरोपीच्या गावाकडे निघाली.
आधारकार्डसह एक बॅगही सापडली
योजनेनुसार, नरेशने तिला त्याच्या घराजवळ एका ऑटोरिक्षात खुंटी येथे नेले आणि तिला थांबण्यास सांगितले. तो धारदार शस्त्रासह परत आला आणि तिच्यावर बलात्कार केल्यानंतर तिच्या दुपट्ट्याने तिचा गळा दाबून खून केला. त्यानंतर त्याने तिच्या शरीराचे ४० ते ५० तुकडे केले आणि त्याच्या पत्नी सोबत राहण्यासाठी तेथून निघून गेला. तथापि महिलेने आपल्या आईला सांगितले होते की ती रेल्वेत बसली आहे आणि तिच्या साथीदारासोबत राहणार आहे. मृतदेहाचे अवयव जप्त केल्यानंतर जंगलात खून झालेल्या महिलेच्या आधारकार्डसह एक बॅगही सापडली. महिलेच्या आईला घटनास्थळी बोलावल्यानंतर तिने आपल्या मुलीचे सामान ओळखले.
महिलेच्या आईला ज्या व्यक्तीवर हत्येचा संशय होता त्याने अटक केल्यानंतर महिलेचे तुकडे केल्याचे कबुल केले. २०२२ चे श्रद्धा वालकर हत्या प्रकरण ताजे असताना या घटनेमुळे परिसरातील लोकांना धक्का बसला आहे.
हेही वाचा :
तरुणीच्या मृत्यूप्रकरणी धक्कादायक खुलासा; शेजाऱ्यानेच केली हत्या