सार
बंगळुरू: येथील एका ऑटोमोबाईल कंपनीचे एक्झिक्युटिव्ह सुभाष अतुल यांनी सोमवारी गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांनी २४ पानांची सुसाईड नोट लिहून ठेवली आहे. सुसाईड नोट मध्ये त्यांची पत्नी, तिचे कुटुंबीय आणि न्यायाधीश यांच्यावर 'आत्महत्येसाठी छळ, खंडणी आणि भ्रष्टाचारासाठी प्रवृत्त केल्याचा'आरोप केला आहे. सुभाष यांनी त्यांच्या सुसाईड नोटमध्ये त्यांच्या १२ 'अंतिम ईच्छा' लिहून ठेवल्या आहेत.
अतुल सुभाष यांनी त्यांच्या सुसाईड नोट मध्ये पत्नी निकिता सिंघानिया हिने ९ खोट्या केस मध्ये अडकवल्याचा आरोप केला आहे. न्यायालयाने त्यांच्या खटल्याची सुनावणी थेट प्रसारीत करण्याची विनंती अतुल यांनी केली आहे. यामुळे जनतेला कायदा व्यवस्थेची भयानक स्थिती पाहण्यास मिळेल. अतुल सुभाष यांनी त्यांच्या सुसाईड नोट मध्ये वैवाहिक समस्यांमुळे अनेक वर्षांचा भावनिक त्रास झाल्याचा आरोप केला आहे. अतुल यांच्या पत्नीने विभक्त झाल्याच्या सुमारे ८ महिन्यांनंतर घटस्फोटाची केस दाखल केली होती आणि अतुल व त्यांच्या संपूर्ण कुटुंबावर वेगवेगळ्या सेक्शन आणि कलमांखाली अनेक आरोप लावले होते.
सुसाईड नोटमध्ये सुभाष यांनी त्यांच्या १२ 'अंतिम ईच्छां' सांगितल्या आहेत :
१. माझ्या केसच्या सर्व सुनावणीचे थेट प्रक्षेपण व्हावे आणि देशातील लोकांना माझ्या केसची माहिती व्हावी. तसेच कायदा व्यवस्थेची गंभीर स्थिती आणि महिला कायद्याचा दुरुपयोग कसा करत आहे हे लोकांना कळावे.
२. कृपया माझी सुसाईड नोट आणि अपलोड केलेला व्हिडीओ माझा जबाब आणि पुरावा म्हणून ग्राह्य धरा.
३. उत्तर प्रदेशातील न्यायाधीश असलेल्या रीता कौशिक या कागदपत्रांमध्ये छेडछाड करू शकतात. साक्षीदारांवर दबाव आणू शकतात आणि इतर प्रकरणांवर विपरित परिणाम करू शकतात, अशी मला भिती वाटते. माझ्या मते बंगळुरू येथील न्यायालये उत्तर प्रदेशातील न्यायालयांपेक्षा तुलनेने अधिक कायद्याचे पालन करणारी आहेत. मला न्याय मिळण्यासाठी खटले कर्नाटकात चालवावेत आणि खटला सुरू असेपर्यंत तिला बंगळुरू येथे न्यायालयीन आणि पोलिस कोठडीत ठेवावे अशी माझी विनंती आहे.
४. माझ्या मुलाचा ताबा माझ्या पालकांना द्या, जे त्याला चांगल्या संस्कारांसह वाढवू शकतील.
५. माझ्या पत्नीला किंवा तिच्या कुटुंबाला माझ्या मृतदेहाजवळ येऊ देऊ नका.
६. मला त्रास देणाऱ्यांना शिक्षा होईपर्यंत माझे अस्थि विसर्जन करू नका. भ्रष्ट न्यायाधीश, माझी पत्नी आणि इतर त्रास देणारे दोषी नाहीत, असे न्यायालयाने ठरवले तर माझ्या अस्थी न्यायालयाच्या बाहेरील गटारात टाका.
७. माझा कायदेशीर व्यवस्थेवर फारसा विश्वास नसला तरी मला त्रास देणाऱ्यांना जास्तीत जास्त शिक्षा द्या. माझ्या पत्नीसारख्या लोकांना तुरुंगात टाकले नाही, तर ते भविष्यात समाजातील इतर मुलांवर खोट्या केसेस टाकतील.
८. न्यायपालिकेला जागे करून माझ्या आई-वडिलांचा आणि भावाचा खोट्या खटल्यात होणारा छळ थांबवावा, असे आवाहन करतो.
९. या दुष्ट लोकांशी कोणतीही वाटाघाटी, समझोता आणि मध्यस्थी होणार नाही आणि दोषींना शिक्षा झालीच पाहिजे.
१०. जोपर्यंत माझी पत्नी खोटे खटले दाखल केल्याचे स्पष्टपणे मान्य करत नाही, तोपर्यंत माझ्या पत्नीला शिक्षेपासून वाचण्यासाठी खटले मागे घेण्याची परवानगी दिली जाऊ नये.
११. माझी पत्नी आता सहानुभूती मिळविण्यासाठी माझ्या मुलाला न्यायालयात आणण्यास सुरुवात करेल असा माझा अंदाज आहे. मी न्यायालयाला विनंती करतो की या नाटकाला परवानगी देऊ नये.
१२. छळ आणि पिळवणूक चालू राहिल्यास कदाचित माझ्या वृद्ध पालकांनी न्यायालयाकडून औपचारिकपणे इच्छामरणाची मागणी करावी. या देशात पतीसह आई-वडिलांना औपचारिकपणे मारून न्यायव्यवस्थेच्या इतिहासात काळे युग निर्माण करू या.
मराठहल्ली पोलीस ठाण्याच्या हद्दीतील मंजुनाथ लेआउट परिसरात सुभाष यांचा मृतदेह लटकलेल्या अवस्थेत आढळून आला. त्या खोलीत 'न्यायाला उशीर झाला आहे' असे लिहिलेले फलक सापडले. अतुल यांच्या मृत्यूनंतर पोलिसांनी सुभाषची पत्नी निकिता सिंघानिया, तिची आई निशा सिंघानिया, भाऊ अनुराग सिंघानिया आणि काका सुशील सिंघानिया यांच्याविरुद्ध एफआयआर नोंदवला. सुभाष यांचा भाऊ विकास कुमार यांनी केलेल्या तक्रारीच्या आधारे बीएनएसच्या कलम १०८ आणि ३(५) अंतर्गत आरोप दाखल करण्यात आले आहेत.
आणखी वाचा-
व्यवस्थेशी हरल्यास अस्थी न्यायालयाबाहेर गटारात अर्पण करा; सुभाष अतुल सुसाईड नोट
बेंगळुरुत उत्तर भारतीय पुरुषाची आत्महत्या, सुसाईड नोटमध्ये धक्कादायक खुलासा