पुण्यातील लोहगड येथे हत्या झालेल्या केतन अग्रवालच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. यानंतर त्याच्या कुटुंबीयांनी दगडूशेठ हलवाई गणपती मंदिरात जाऊन न्यायासाठी साकडं घातलं. यावेळी केतनच्या बहिणीने आपल्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळावा, अशी भावना व्यक्त केली.

पुणे जिल्ह्यातील लोहगड येथे केतन अग्रवालची हत्या करण्यात आली. आज १८ जुलै रोजी त्याच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. त्यानंतर आज कुटुंबीय दगडूशेठ हलवाई गणपतीला साकडं घालायला आलं होत. यावेळी कुटुंबातील सर्व सदस्य हजर होते. यावेळी केतनच्या बहिणीनं आपलं मत व्यक्त केलं आहे.

काय म्हणाली केतनची बहीण? 

आज माझ्या भावाच्या हत्येला एक महिना पूर्ण झाला आहे. एक महिना झाला त्याला मी पाहिलं नाही. त्याचा चेहरा पाहिलं नाही की त्याच हसू मला दिसलं नाही. माझी बाप्पाच्या चरणी एवढीच मागणी आहे की बाप्पाला माझ्या भावाला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. तो जिथं कुठं असू तिथं तो आनंदानं राहावा आणि त्याला शांती मिळावी.

आजोबांचा आज वाढदिवस 

आज माझ्या आजोबांचा वाढदिवस आहे. माझा भाऊ केतनच्या मृत्यूला एक महिना पूर्ण झाला. हे दुःख आमच्या कुटुंबासाठी फार मोठं आहे. आम्ही गणरायाच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की केतनला लवकरात लवकर न्याय मिळाला पाहिजे. पोलीस याप्रकरणात कसून चौकशी करत आहेत. आता याप्रकरणात पुढं काय होतं याकडं सर्वांचं लक्ष लागून राहील आहे.