मेरठमध्ये एका व्यक्तीने सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची चाकू आणि ब्लेडने वार करून खून केली. आरोपीने नंतर स्वतः पोलिसांना फोन करून हत्येची माहिती दिली.
मेरठ: सध्याच्या काळात हत्या करण्याचं प्रमाण मोठ्या प्रमाणावर वाढत चाललं आहे. एका व्यक्तीने आपल्या सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीची वार करून निर्घृण खून केल आहे. शनिवारी (2 ऑगस्ट) सकाळी उत्तर प्रदेशातील मेरठमधील गंगानगर येथील अमेडा गावात ही हृदयद्रावक घटना घडली आहे. हत्या करण्यासाठी पतीने चाकू आणि ब्लेडचा वापर केला होता.
पत्नी सात महिन्यांची गर्भवती
पत्नी सात महिन्यांची गर्भवती होती. आरोपीने हत्या केल्यानंतर स्वतःहून पोलीस स्टेशनमध्ये कॉल केला आणि हत्येची माहिती दिली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी भेट दिली आणि आरोपीला अटक केली. गर्भवती पत्नीवर आरोपीने वार करून हत्या केली. अमेडा गावातील भवनपूर येथील रहिवासी रविशंकर यांनी आपली पत्नी सपना (26) ची चाकूने खून केल आहे.
लॉकेट घालायच्या बहाण्याने डोळे बंद करायला लावले आणि
सात महिन्यांच्या गर्भवती पत्नीला लॉकेट घालण्याच्या बहाण्याने डोळे बंद करायला सांगितले आणि त्यानंतर तिचा गळा चिरला. त्यानंतर तिच्यावर २० वेळा वार केले होते. त्यामुळे पत्नीसह बाळाचा मृत्यू झाला. आरोपीने स्वतः फोन करून पोलिसांना या घटनेची माहिती दिली आणि त्याची चौकशी केली आहे. याप्रकरणी पोलिसांनी माहिती दिली आहे.
सपनाचे लग्न यावर्षी जानेवारीमध्ये झाले होते. सपना तिच्या सासरच्या घरातून पाच दिवसांपूर्वी तिच्या बहिणीच्या घरी आली होती. आरोपीला पत्नीवर संशय असल्यामुळं त्यानं पत्नीचा खून केल. चौकशीदरम्यान रविशंकरने सांगितलं की, त्याने तिच्यासाठी एक लॉकेट आणलं होत. तो स्वतःच्या हातांनी तिच्या गळ्यात घालणार होता. त्यासाठी त्याने सपनाला डोळे बंद करण्यास सांगितलं. आणि त्याने तिचा गळा चिरला. कुटुंबाने त्याच्यावर हुंड्यासाठी हत्या केल्याचा आरोप केला आहे.
