सार

Yavatmal Crime News : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथून एक खळबळजनक बातमी समोर आली असून यात अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे.

 

Yavatmal Crime News : यवतमाळच्या घाटंजी तालुक्यातील राजुरवाडी येथून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यात अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची निर्घृण हत्या केल्याची घटना उघडकीस आली आहे. प्रभाकर मारवाडी असे हत्या झालेल्या पतीचे नाव आहे. तर जयश्री प्रभाकर मारवाडी असे पत्नीचे नाव आहे. तर सुरज रोहनकर असे प्रियकराचे नाव आहे. 

अनैतिक संबंधातून पत्नीने प्रियकराच्या मदतीने पतीची केली निर्घृण हत्या

गेल्या काही काळापासून जयश्री प्रभाकर मारवाडी आणि प्रियकर सुरज रोहनकर या दोघांचे प्रेम संबंध जुळले होते. त्यांच्या या प्रेमसंबंधात जयश्री मारवाडी हिचा पती मृतक प्रभाकर मारवाडी अडसर ठरत होता. हा अडसर दूर करण्यासाठी  गेल्या काही दिवसांपासून जयश्री मारवाडी आणि तिचा प्रियकर सुरज रोहनकर यांनी प्रयत्न करत होते. मात्र त्यांना यश आले नव्हते. खूप दिवसांपासून जयश्री मारवाडी आणि तिचा प्रियकर सुरज रोहनकर हे मृतक प्रभाकर मारवाडी याचा काटा काढण्याच्या तयारी होते. जयश्री मारवाडी आणि तिचा प्रियकर सुरज रोहनकर यांचे प्रेमसंबंध अधिक बहरत असताना त्यांनी शेवटी त्यांच्या प्रेमसंबंधात मृतक प्रभाकर मारवाडी हा अडसड ठरत होता. दरम्यान प्रेमात अडसर ठरू पाहणाऱ्या पतीची हत्या करून हा अडसर दुर करावा, असा या दोघांचा बेत होता.

पत्नी आणि प्रियकराने तोंड दाबून पतीचा काढला काटा 

दरम्यान, जयश्री मारवाडी आणि सूरज रोहनकर यांनी एक दिवस आखलेल्या योजनेनुसार प्रभाकर मारवाडी याचे तोंड दाबून त्याची हत्या केली. आणि त्यांच्या प्रेमसंबंधातील अडसर दूर केले. त्यानंतर हत्येचा पुरावा मिटवण्याच्या अनुषंगाने गावाशेजारील एका फाट्यावर पती प्रभाकर मारवाडी यांचा मृतदेह फेकून दिला आणि तिथून पसार झाले. मात्र कालांतराने हा संपूर्ण प्रकार उघडकीस आला. याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखा आणि स्थानिक पोलिसांनी प्रकरणाची चौकशी केली असता संशयाची सुई पत्नी आणि तिच्या प्रियकराकडे वळली. दरम्यान पोलिसांनी या दोघांची कसून चौकशी केली असता दोघांनीच प्रभाकरची हत्या केल्याची कबुली दिली. पोलिसांनी तपासाची चक्र वेगाने फिरवून ही घटना उघडकीस आणली आहे. सध्या पोलिसांनी दोघांनाही ताब्यात घेतले असून पुढील कायदेशीर कारवाई सध्या पोलीस करत आहेत. पती-पत्नीच्या प्रेमळ नात्याला काळिमा फासणाऱ्या या हत्येच्या घटनेने सर्वत्र परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

आणखी वाचा : 

Sassoon Hospital: ससूनचे निर्दयी डॉक्टर अखेर निलंबित, 2 जणांवर गुन्हा दाखल