सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगावच्या जामनेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून प्रकाश कापडे असे या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे.

जळगाव: सचिन तेंडुलकरच्या सुरक्षारक्षकाने स्वत:ला गोळी झाडून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. जळगावच्या जामनेरमध्ये ही धक्कादायक घटना घडली असून प्रकाश कापडे असे या एसआरपीएफ जवानाचे नाव आहे. या एसआरपीएफ जवानाने स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली आहे. त्यामुळे संपूर्ण जळगावमध्ये खळबळ उडाली आहे. ते मुंबईत सेवा बजावत होते. विशेष म्हणजे ते सचिन तेंडुलकरच्या सुरक्षेत काही काळ तैनात होते.

Add Asianetnews Marathi as a Preferred SourcegooglePreferred

प्रकाश कापडे हे 8 दिवसापूर्वी जामनेर मध्ये आले होते. बुधवारी पहाटे गणपतीनगर येथील राहत्या घरी त्यांनी स्वतःच्या डोक्यात गोळी झाडून आत्महत्या केली. आत्महत्येचे कारण अद्याप अस्पष्ट असून याप्रकरणी जामनेर पोलिसात नोंद करण्यात आली आहे. विशेष म्हणजे प्रकाश कापडे यांनी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांच्याकडे ही काही काळ सुरक्षा रक्षक म्हणून जबाबदारी पार पाडली असल्याची माहिती आहे. ते एसआरपीएफमध्ये होते. त्यांनी अचानक आत्महत्या केल्याने हळहळ व्यक्त होत आहे. मात्र त्यांनी आत्महत्या का केली याचा तपास आता पोलीस करत आहेत.