Pune Crime News : धक्कादायक बातमी! पुण्यात एकाच दिवशी बलात्काराच्या 5 घटना, विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल

| Published : Jun 13 2024, 11:00 AM IST / Updated: Jun 13 2024, 11:15 AM IST

rape 1.jp

सार

Pune Crime News : पुण्यात एकाच दिवशी बलात्काराच्या 5 घटना घडल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

 

Pune Crime News : पुण्याहून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. पुण्यात एकाच दिवशी बलात्काराच्या 5 घटना घडल्या आहेत. लग्नाचे आमिष, सोशल मीडियावरील ओळख, अपहरण आणि जीवे मारण्याची धमकी देत या 5 बलात्काराचा घटना घडल्या आहेत. या प्रकरणी विमानतळ पोलीस स्टेशन, लोणिकंद पोलीस स्टेशन, कोंढवा पोलीस स्टेशन, स्वारगेट पोलीस स्टेशनमध्ये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं आहे. एकाच दिवशी पाच बलात्काराच्या घटना घडल्या आहेत. याप्रकरणी विविध पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. पोलीस याप्रकरणी आरोपींचा तपासही करत आहे.

बलात्काराच्या घटनेनं पुणे हादरलं

1) पहिल्या घटनेत कोल्हापूरच्या एका 34 वर्षीय महिलेवर लग्नाचं अमिष दाखवून बलात्कार केल्याचा प्रकार घडला आहे. याप्रकरणी गुन्हा दाखल झाला असून पोलीस तपास करत आहेत.

2) दुसऱ्या घटनेत 22 वर्षीय तरुणीला लग्नाचं अमिष दाखवून जीवे मारण्याची धमकी देत बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

3) तिसऱ्या घटनेत विवाहित महिलेच्या मुलाला जीवे मारण्याची धमकी देत महिलेवर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

4) चौथ्या घटनेत अल्पवयीन मुलीशी इंस्टाग्रामवर ओळख वाढवून तिच्याशी मैत्री करुन तिला नातेवाईकाच्या घरी नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

5) पाचव्या घटनेत अल्पवयीन मुलीचं अपहरण करुन तिला गोव्याला नेऊन तिच्यावर बलात्कार केल्याची घटना घडली आहे.

आणखी वाचा :

Crime : लग्नाचे वचन देऊन महिलेवर बलात्कार आणि परिवाकडून हुड्यांची मागणी, पीडितेकडून पोलिसांत गुन्हा दाखल