सार

बंगळुरूतील आर्टिफिशिल इंटेलिजेंस स्टार्टअप कंपनीची सीईओ सूचना सेठने मुलाची हत्या करण्याआधी आपल्या पतीला मेसेज केला होता. आता हत्येसंदर्भात पोलिसांनी केलेल्या तपासात काही धक्कादायक खुलासे झाले आहेत.

Suchana Seth Case : बंगळुरूमधील (Bengaluru) आर्टिफिशिअल इंटेलिजेंस स्टार्टअप कंपनीची सीईओ सूचना सेठने आपल्याच पोटच्या मुलाची हत्या केली. मुलाच्या हत्येनंतर त्याचा मृतदेह बॅगेत भरून पळ काढण्याचाही प्रयत्न केला. पोलिसांनी सूचनाला अटक केली असून तपासात काही धक्कादायक खुलासे झाले आहेत.

प्राप्त झालेल्या माहितीनुसार, घटस्फोटीत सीईओ सूचना सेठने मुलाच्या हत्येच्या एक दिवसआधी पतीला मेसेज केला होता. मेसेजमध्ये सूचनाने पतीला तो मुलाला भेटू शकतो असे म्हटले होते. पण मुलाची आणि वडिलांची भेट झाली नाही. त्याआधीच सूचनाने मुलाचा जीव घेतला होता.

सूचनाने गोव्यातील एका हॉटेलमध्ये मुलाची हत्या केली होती. पोलिसांनुसार, हत्या करणाऱ्या महिलेला मुलाचा जीव घेतल्याबद्दल काहीही वाटत नाही.

हत्येचा पोलिसांकडून तपास
आतापर्यंत झालेल्या पोलीस तपासात समोर आलेय की, 7 जानेवारीला हत्येच्या एक दिवसआधी म्हणजेच 6 जानेवारीला सूचनाने एक्स-पती वेंकट रमनला मेसेज पाठवला होता. मेसेजमध्ये सूचनाने पतीला म्हटले होते की, मुलाला तो भेटू शकतो. पण ते दोघे बंगळुरूमध्ये नव्हते. यामुळे वडिलांना मुलाला भेटता आले नाही आणि तो इंडोनेशियाला परत गेला.

आरोपी महिलेला असे पकडले
गोवा हॉटेलमध्ये हत्या केल्यानंतर सूचनाने मुलाचा मृतदेह एका सूटकेसमध्ये भरून हॉटेलमधून पळ काढला. संशय आल्यानंतर पोलिसांना सूचनाबद्दल माहिती देण्यात आली आणि तिला कर्नाटकातील चित्रदुर्ग येथून अटक करण्यात आली.

हॉटेलच्या स्टाफने सूचनासोबत मुलगा नसल्याचे पाहिल्याने याबद्दलची माहिती पोलिसांना दिली. पोलिसांनी सूचना ज्या टॅक्सीने प्रवास करत होती त्या टॅक्सी चालकाला संपर्क करत तिला जवळच्या पोलीस स्थानकात नेण्यास सांगितले. अशाप्रकारे पोलिसांनी सूचनाला अटक केली. पण मुलाचा मृत्यू कसा झाला याबद्दलची माहिती समोर आलेली नाही.

आणखी वाचा : 

सूचना सेठीला लग्नाच्या 9 वर्षानंतर झाला होता मुलगा, शुल्लक कारणाने घेतला चिमुकल्याचा जीव

बंगळुरूमधील AI कंपनीच्या CEOने केली स्वत:च्या मुलाची हत्या, गोवा पोलिसांनी असा लावला गुन्ह्याचा छडा

Mumbai : 19 वर्षीय विद्यार्थिनीची इमारतीच्या 14व्या मजल्यावरून खाली उडी मारत आत्महत्या