सार

Akola Crime : महाराष्ट्रातील अकोल्यात जिल्ह्या परिषदेच्या शाळेतील एका शिक्षकाने विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे. याशिवाय शिक्षकाने अश्लील व्हिडीओ दाखवल्याचाही त्याच्यावर आरोप लावण्यात आला आहे.

Akola Crime News : कोलकातानंतर बदलापुर आणि आता अकोल्यातील एक प्रकरण समोर आले आहे. अकोल्यातील एका जिल्ह्या परिषदेच्या शाळेतील शिक्षकाने सहा विद्यार्थिनींचा विनयभंग केल्याची बाब उघडकीस आली आहे. या प्रकरणात पोलिसांकडून तातडीने आरोपीच्या मुसक्या आवळण्यात आल्या आहेत. याशिवाय 20 ऑगस्टला पीडित विद्यार्थिनींचा जबाब नोंदवण्यात आला आह.

नक्की काय आहे प्रकरण?
रिपोर्ट्सनुसार, काही विद्यार्थिनींना 47 वर्षीय शिक्षकांकडून त्रास दिला जात होता. याशिवाय विद्यार्थिनींना अश्लील व्हिडीओ देखील दाखवण्यात येत होते. प्रमोद मनोहर सरदार असे आरोपीचे नाव आहे. आरोपी काजीखेडमधील जिल्ह्या परिषदेच्या शाळेत शिक्षक पदावर कार्यरत आहे. या प्रकरणात पोलिसांकडून आरोपीला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात भारतीय न्याय संहिता आणि पॉक्सो अ‍ॅक्ट अंतर्गत कलम 74 आणि 75 नुसार गुन्हा दाखल केला आहे. अकोल्याचे पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांनी म्हटले की, सध्या प्रकरणात अधिक तपास सुरु आहे.

बदलापूरमधील घटनेने नागरिक रस्त्यांवर
सध्या देशभरात दररोज मुलींचे झालेले लैगिंक शोषण, हत्या, बलात्कार अशा घटना उघडकीस येत आहेत. कोलकातामधील घटना ताजी असतानाच बदलापूरमधील नामांकित शाळेतील चार वर्षांच्या दोन मुलींवर लैंगिक अत्याचार केल्याचे प्रकरण समोर आले. अशातच हजारोंच्या संख्येने नागरिकांनी रेल्वे स्थानकात उतरून चक्का जाम केला. याशिवाय नागरिकांकडून आरोपीला फाशीची शिक्षा द्यावी अशी सातत्याने मागणी केली जात होती. दरम्यान, पोलिसांनी लाठीचार्ज केल्यानंतर रेल्वे ट्रॅकवर आंदोलकांना पोलिसांनी बाजूला केले. अशातच 10 तासांनंतर रेल्वे सुविधा पुर्ववत झाली.

बदलापुरमधील प्रकरणात गुन्हा दाखल करण्यासाठी पीडित परिवाराला 12 तास पोलीस स्थानकात बसवून ठेवल्याचा आरोप देखील लावला गेला. यामुळेच नागरिकांनी आंदोलन अधिक तीव्र करत आरोपीला कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी केली. काही महिलांनी आमच्या मुली सुरक्षित नाही, त्यांना घराबाहेर पाठवताना आम्हाला देखील आता भीती वाटते अशा प्रतिक्रिया मीडियासमोर दिल्या आहेत.

दरम्यान, बदलापुरमधील शाळेतील ज्या मुलींचे लैंगिक शोषण झाले आहे त्यामधील एक विद्यार्थिनी केवळ 3 वर्षांची तर दुसरी 4 वर्षांची आहे. या दोन्ही विद्यार्थिनींचे लैंगिक शोषण करणारा आरोपी 24 वर्षांचा आहे. आरोपीने पीडित मुलींचे लैंगिक शोषण केल्यानंतर त्यांना कोणाला घटनेबद्दल सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी देखील दिली होती. आज बदलापूरमध्ये कठोर पोलीसांचा बंदोबस्त करण्यात आला आहे. 

आणखी वाचा : 

बदलापूर अत्याचार प्रकरण: मनोज जरांगेंचा संतप्त सवाल, 'सरकारचे लक्ष कुठे?'

बदलापूर प्रकरण: उद्धव ठाकरेंचा शिंदे सरकारवर हल्लाबोल