पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बाथरूम मध्ये तर दोन महिलांचे मनगट ब्लेडच्या साहाय्याने कापलेले...हा प्रकार पाहून पोलिसही झाले थक्क

| Published : Apr 03 2024, 06:28 PM IST

Kerala Couple
पुरुषाचा मृतदेह रक्ताच्या थारोळ्यात बाथरूम मध्ये तर दोन महिलांचे मनगट ब्लेडच्या साहाय्याने कापलेले...हा प्रकार पाहून पोलिसही झाले थक्क
Share this Article
  • FB
  • TW
  • Linkdin
  • Email

सार

अरुणाचल प्रदेशातील एका हॉटेलमध्ये मृतावस्थेत सापडलेल्या केरळमधील पती, पत्नी आणि एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खबळल उडाली आहे.

अरुणाचल प्रदेशमधील एका हॉटेलमध्ये दोन महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. दोन्ही महिलांचे मनगट ब्लेडच्या साह्याने कापण्यात आले होते. तर पुरुषाचा मृतदेह हा बाथरूममध्ये रक्ताच्या थारोळ्यात पडला होता. हे हत्याकांड 'जादूटोण्यातून झालेला असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी लावला असून उर्वरित तपास पोलीस करत आहे.

अरुणाचल प्रदेशात एका हॉटेलमध्ये केरळचे तिघे जण फिरण्यासाठी आले होते. या तिघांचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली आहे. दोन महिला आणि एका पुरुषाचा मृतदेह आढळल्याने या घटनेमागे उलट सुलट शंका उपस्थित करण्यात येत आहेत. केरळमधील कोट्टायम येथील रहिवासी असणारे नवीन थॉमस (वय ३९), पत्नी देवी बी (वय ३९) आणि मैत्रीण आर्य बी नायर (वय २९) यांच्यासोबत २८ मार्च रोजी हॉटेलमध्ये राहण्यासाठी आले होते.

पोलिस आयुक्त सी. नागराजू म्हणाले की, तिघे एकाच खोलीत आढळल्याने अनेक शंका उपस्थित होत आहेत. तिघांचे मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत. या घटनेचा संबंध 'काळ्या जादूशी आहे की नाही हे आम्ही सांगू शकणार नाही. पोलिसांचे एक पथक घातस्थळी जाणार असून योग्य तपासानंतर या बद्दल तर्कवितर्क काढण्यात येईल. हे तिघे तिथे का गेले, काय करत होते, याचाही तपास करण्यात येणार आहे. याशिवाय पोलिसांना मृत्यूचे कारणही जाणून घ्यायचे आहे.

कर्मचाऱ्यांना संशय आला आणि दरवाजा उघडताच दिसले मृतदेह :

हे तिघेही अरुणाचल प्रदेशातील लोअर सुननसिरी जिल्ह्यात आले होते आणि येथील एका हॉटेलमध्ये थांबले होते, असे लोअर सुबनसिरीचे पोलीस अधीक्षक केनी बगरा यांनी सांगितले. ते म्हणाले की, नवीन थॉमसने २८ मार्च रोजी त्याची पत्नी आणि मैत्रिणीसह हॉटेलमध्ये चेक इन केले होते. बागरा म्हणाले, 'हॉटेल कर्मचाऱ्यांकडून माहिती मिळाली की, १ एप्रिलपासून पाहुणे ते हॉटेलमध्ये वावरतांना दिसले नाहीत. मंगळवारी पहाटे त्यांना याचा संशय आला. हॉटेल कर्मचारी त्यांच्या खोलीत तपासणीसाठी गेले असता, यावेळी खोलीचा दरवाजा आतून बंद असल्याचे आढळले. हॉटेल कर्मचाऱ्यांनी त्यांच्या खोलीचा दरवाजा तोडला तेव्हा त्यांना तिघांचेही मृतदेह आढळले. खोलीत सर्वत्र रक्त होते.

घटनेची माहिती पोलिसांना कळवली :

या घटनेची माहिती पोलिसांना मिळताच त्यांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पीटीसी बांदेरदेवा येथील फॉरेन्सिक तज्ञांच्या मदतीने पोलीस पथकाने हॉटेलच्या खोलीत उपलब्ध असलेले सर्व पुरावे ताब्यात घेतले. बागरा म्हणाले, 'पोस्टमॉर्टमचा अहवाल बुधवारी येणार आहे. सीआरपीसी अंतर्गत अनैसर्गिक मृत्यूचे तीन गुन्हे दाखल करण्यात आले आहे. या प्रकरणाचा तपास एसआय जे डोये करत आहेत. प्राथमिक तपासात मृत आर्य बी नायर बेपत्ता असल्याची तक्रार तिरुअनंतपुरममध्ये नोंदवण्यात आली होती. यामुळे या घटनेचे गूढ आता आणखी वाढले आहे.

आणखी वाचा :

हुंड्याची मागणी पूर्ण न केल्यामुळे सासरच्या मंडळींनी केली महिलेची हत्या...

Crime News : मित्रचं झाला वैरी ; ब्लो ड्रायरचे नोझल गुदाशयात टाकल्याने तरुणाचा मृत्यू