गोरेगाव येथील एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी मारून १७ वर्षीय विद्यार्थिनीने आत्महत्या केली. मुलगी आरे कॉलनीतील ओबेरॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये राहत होती आणि अभ्यासाच्या दबावाखाली होती.

मुंबई: सध्याच्या काळात आत्महत्येच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडत आहेत. अशीच एक घटना मुंबईत घडली आहे. गोरेगाव येथील एका इमारतीच्या २३ व्या मजल्यावरून उडी खाऊन १७ वर्षाच्या विद्यार्थिनीने तीच आयुष्य संपवलं आहे. पीडित मुलगी ही मुंबईतील एका नामांकित शाळेमध्ये शिकत होती. तिने आत्महत्या केल्यामुळं एकच खळबळ उडाली आहे.

मुलगी कोठे राहत होती? 

पीडित मुलगी ही मुंबईतील आरे कॉलनी परिसरातील ओबेरॉय स्क्वेअर सोसायटीमध्ये राहत होती. मुलीचे वडील व्यावसायिक होते. मुलगी मुंबईतील महाविद्यालयात अकरावी इयत्तेत शिकत होती. अभ्यासात हुशार असलेल्या मुलीवर तिच्या अभ्यासाचं मोठं दडपण होत. ती अनेक दिवसांपासून आजारी होती, तिच्यावर धीरूभाई अंबानी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरु होते.

गुरुवारी दुपारी केली आत्महत्या 

गुरुवारी दुपारी मुलगी तिच्या खोलीमध्ये होती. तिने अचानक २३ व्या मजल्यावरून उडी मारून आपलं आयुष्य संपवलं आहे. यावेळी मोठा आवाज झाल्यामुळे आजूबाजूचे लोक जमा झाले होते. त्यांनी ताबोडतोब मुलीच्या घरच्यांना कळवले. पण तिला हॉस्पिटलमध्ये घेऊन जाईपर्यंत मुलगी मृत झाली होती. या घटनेमुळे तिच्या घरच्यांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

वडिलांचा नोंदवला जबाब 

या घटनेनंतर पोलिसांनी तात्काळ मुलीच्या घरी भेट दिली. येथे गेल्यानंतर त्यांनी मुलीच्या वडिलांचा जबाब नोंदवला. त्यांनी आपली मुलगी अभ्यासाच्या टेन्शनमुळे दबावात होती असं सांगितलं आहे. मुलीच्या घरच्यांनी कोणावरही संशय व्यक्त न केल्यामुळे गुन्हा दाखल करण्यात आला नाही. बॉडीचे शवविच्छेदन करून कुटुंबाच्या हवाली करण्यात आली.