मैत्रीणीच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या एका 14 वर्षीय मुलीवर दोन जणांनी बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एवढेच नव्हे बलात्काराचा व्हिडीओ काढून तिच्या आईला देखील पाठवण्यात आली.
Mumbai Crime : मुंबईत एका 14 वर्षीय मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेने मुंबईत खळबळ उडाली असून दोन जणांच्या विरोधात पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. खरंतर, मैत्रीणीच्या बर्थडे पार्टीला गेलेल्या या 14 वर्षीय पीडित मुलीवर बलात्कार करण्यात आल्याची घटना मुंबईतील मालवणीत घडल्याचे सांगितले जात आहे.
नक्की काय घडले?
सदर घटनेत पीडित मुलगी फेब्रुवारी महिन्यात मैत्रीणीच्या बर्थडे पार्टीला तिच्या घरी गेली होती. त्यावेळी मैत्रीणीच्या घरी कोणीही नव्हते. पण मैत्रीणीने थोडावेळाने एखादे काम आहे असे सांगून घराबाहेर पडली असता तेथे 23 वर्षाचा एक तरुण आला. याच तरुणाने पीडित मुलीवर बलात्कार करत त्याचा व्हिडीओ काढला.
दुसऱ्या मित्रानेही केला बलात्कार
पहिल्या आरोपीने केलेल्या बलात्काराचे चित्रीकरण दुसऱ्या मित्राला पाठवण्यात आले. त्या व्हिडीओच्या आधारे दुसऱ्या तरुणाने पीडितेला ब्लॅकमेल करण्यास सुरुवात केली. त्याने धमकी दिली की, जर तिने त्याच्याशी संबंध ठेवले नाहीत, तर तो व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल करेल. या भीतीपोटी पीडित मुलगी एप्रिल महिन्यात त्याला भेटायला गेली.
तो तिला गोराई येथील एका लॉजवर घेऊन गेला आणि तिथे तिच्यावर पुन्हा बलात्कार केला. पीडितेला वाटले की हा भयावह प्रकार इथेच थांबेल, पण त्यानंतरही सुमारे दीड महिन्याच्या कालावधीत त्या दोन्ही आरोपींनी तिला सतत धमकावत तिच्यावर पुन्हा पुन्हा अत्याचार केला.
अश्लील व्हिडीओ आईपर्यंत पोहोचला, गुन्हा उघडकीस
6 जून रोजी पीडित मुलीच्या आईला ती अश्लील चित्रफीत पाठवण्यात आली. यानंतर संपूर्ण प्रकार उघड झाला. मालवणी पोलिसांनी या प्रकरणी तत्काळ कारवाई करत आरोपींविरोधात भारतीय न्याय संहितेच्या कलम 64 (1), 56 (1), 3 (5) तसेच माहिती तंत्रज्ञान कायद्यांतर्गत गुन्हा दाखल केला.तपासात दोन्ही आरोपींना अटक करण्यात आली असून, पहिला आरोपी 23 वर्षांचा असून ओला चालक आहे. दुसरा आरोपी परिसरात पाळीव कुत्रा सांभाळण्याचे काम करतो.
सध्या आरोपी पोलीस कोठडीत असून त्यांची चौकशी सुरु आहे. त्यांचे मोबाईल जप्त करून तपासणीसाठी न्यायवैद्यक प्रयोगशाळेत पाठवले आहेत. विशेष म्हणजे, ज्या मैत्रीणीच्या घरी वाढदिवसाच्या पार्टीसाठी पीडितेला बोलावण्यात आले होते, तिचीही भूमिका संशयास्पद मानून तपास सुरू करण्यात आला आहे, अशी माहिती मालवणी पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक शैलेंद्र नगरकर यांनी दिली.
दादरमध्ये टॅक्सी चालकाकडून अल्पवयीन मुलीसोबत चाळे
मे महिन्यात अल्पवयीन मुलीसोबत एका उबर टॅक्सी चालकाने अश्लील चाळे केल्याचा प्रकार उघडकीस आला. पीडित मुलीने घरी जाण्यासाठी टॅक्सी बुक केली असता तिला निर्जन ठिकाणी घेऊन जात तिचा विनयभंग केला. पीडित मुलगी पवईत राहते. या प्रकरणात दादर पोलिसांकडे पीडित मुलीच्या वडिलांनी तक्रार दाखल केली होती.
(राहा अपडेट, राहा जगाच्या पुढे. सातत्याने अपडेट होणाऱ्या आमच्या फेसबुक आणि एक्स (ट्विटर) पेजला सबक्राईब करुन ताज्या घडामोडी जाणून घ्या.)
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या फेसबुक पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.
आमच्या एशियानेट न्यूज मराठीच्या एक्स (ट्विटर) पेजला सबस्क्राईब करा. त्यासाठी येथे क्लिक करा.


