DBS Bank Service Charges : DBS बँक इंडिया 1 ऑगस्ट 2025 पासून नवीन सेवा शुल्क धोरण लागू करत आहे. बचत खात्यातील आवश्यक मासिक सरासरी शिल्लक (AMB) न राखल्यास दंड आकारला जाईल. ATM व्यवहार शुल्कातही मे 1, 2025 पासून बदल झाले आहेत.
मुंबई : DBS बँक इंडिया आपल्या खातेदारांसाठी नवीन सेवा शुल्क धोरण लागू करत आहे. 1 ऑगस्ट 2025 पासून, बचत खात्यातील मासिक सरासरी शिल्लक (AMB) न राखणाऱ्या खातेदारांना आता अधिक दंड भरावा लागणार आहे. बँकेने ही सुधारणा रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (RBI) च्या मार्गदर्शक सूचनांनुसार केल्याचे स्पष्ट केले आहे.
कोणत्या खात्याला किती शिल्लक ठेवावी लागेल?
DBS बँकेच्या नियमानुसार, सामान्य बचत व Growth One खात्यांसाठी ₹10,000 मासिक सरासरी शिल्लक (AMB) आवश्यक आहे. जर ही रक्कम राखली नाही, तर शिल्लक रकमेवर 6% दंड आकारला जाईल, जो कमाल ₹500 पर्यंत असेल. Growth One बचत खात्यांसाठी ₹5,000 AMB आवश्यक असून, शिल्लक कमी झाल्यास 6% दंड आकारला जाईल, ज्याची मर्यादा ₹250 आहे. SB ‘Others’ खात्यांकरिता ₹1,000 शिल्लक अनिवार्य आहे आणि त्यावरचा दंड 6% असून कमाल ₹50 असेल. लक्ष्मी सेव्हिंग्स यूथ पॉवर खात्यांसाठी फक्त ₹100 शिल्लक आवश्यक आहे. यामध्ये शिल्लक न ठेवल्यास 6% दंड आकारला जाईल, जो फक्त ₹5 पर्यंत मर्यादित असेल. TASC यूथ पॉवर खात्यांनाही ₹10,000 मासिक शिल्लक राखावी लागते, आणि दंडाची मर्यादा इतर खात्यांसारखीच ₹500 आहे.
टीप: वरील शुल्क 1 ऑगस्ट 2025 पासून आपोआप लागू होतील, त्यामुळे ग्राहकांनी वेळोवेळी आपली खाते शिल्लक तपासून ठेवावी.
ATM व्यवहार शुल्कातही वाढ, मे 1 पासून लागू
मे 1, 2025 पासून DBS बँकेने ATM व्यवहारांवरील शुल्कातही बदल केला आहे. हे शुल्क RBI च्या सुधारित मार्गदर्शक तत्त्वांनुसार आहेत.
DBS बँकेच्या ATM वर व्यवहार
अमर्यादित आणि पूर्णपणे मोफत
इतर बँकांच्या ATM वर
मेट्रो शहरांमध्ये 3 मोफत व्यवहार आणि गैर-मेट्रोमध्ये 5 मोफत व्यवहार
नंतरच्या प्रत्येक व्यवहारासाठी ₹23 + कर दंड
शिल्लक तपासणीसारखे गैर-आर्थिक व्यवहार: मेट्रोसाठी 7, गैर-मेट्रोसाठी 11 मोफत; नंतर ₹10.5 प्रति व्यवहार
ग्राहकांसाठी महत्त्वाच्या सूचना
आपल्याकडे कोणते खाते आहे, त्यानुसार मासिक शिल्लक राखा.
DBS बँकेच्या ATMचा वापर करा किंवा ऑनलाइन बँकिंगचा पर्याय निवडा, हे मोफत आणि सोयीचे आहे.
इतर बँकांच्या ATMचा वापर करताना व्यवहारांची मर्यादा लक्षात ठेवा.
नवीन शुल्क धोरणामुळे खातेदारांनी आपली बँकिंग सवय सुधारण्याची आवश्यकता आहे. वेळेवर शिल्लक राखल्यास अनावश्यक दंड वाचवता येईल.