आज मायक्रोसॉफ्ट कंपनीचे सर्व्हर डाऊन झाल्याची आपण बातमी वाचली असेल. हे सर्व्हर डाऊन झाले म्हणजे काय झाले आणि त्याबद्दलची इतर माहिती जाणून घेऊयात.
शुक्रवारी, १९ जुलै रोजी मायक्रोसॉफ्टच्या आउटेजमुळे जगभरातील विविध क्षेत्रांवर मोठा परिणाम झाला. Windows 10 वर परिणाम करणाऱ्या सॉफ्टवेअर अपडेटमुळे स्टॉक एक्स्चेंज, रेल्वे, बँकिंग, एअरलाइन्स आणि आयटी क्षेत्रांसह अनेक मोठ्या कंपन्यांचे काम ठप्प झाले.
पश्चिम बंगाल पोलिसांनी व्यापाऱ्यावर प्राणघातक हल्ला केल्याच्या प्रकरणातील मुख्य आरोपी सद्दाम सरदार याला दक्षिण २४ परगणा जिल्ह्यातील कुलताली येथून अटक केली आहे. सद्दामवर बनावट सोन्याच्या मूर्ती विकून आणि वस्तू न देता लोकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
मायक्रोसॉफ्टच्या क्लाउड सेवेतील खराबीमुळे जगभरातील वापरकर्त्यांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. निळा स्क्रीन दाखवून ऑपरेटिंग सिस्टममध्ये समस्या असल्याचे सांगण्यात येते.
प्रशिक्षणार्थी IAS पूजा खेडकर यांच्या आई मनोरमा खेडकर यांचा हातात बंदूक घेतलेला व्हिडिओ व्हायरल झाल्याने मोठ्या प्रमाणावर टीका झाली. पोलीस त्यांना पकडण्यासाठी जात असताना त्या महाड येथील लॉजमध्ये "इंदुबाई" नावाचे बनावट आधारकार्ड दाखवून लपल्या.
हार्दिक पांड्याने नताशा स्टँकोविकसोबत घटस्फोट घेतल्याची माहिती इंस्टाग्रामवरून दिली आहे. त्यांनी सोशल मीडियावर पोस्ट करून ही बातमी चाहत्यांपर्यंत पोहोचवली. दोघांनी सांगितले की, त्यांचा मुलगा अगस्त्यची जबाबदारी दोघांवरही राहील.
विराट कोहली आणि अनुष्का शर्मा हे लंडनला शिफ्ट झाले आहेत. लंडनच्या रस्त्यावर मुलगा अकायसोबत फिरताना त्यांचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. विराट-अनुष्का यांचे वैयक्तिक आयुष्य खाजगी ठेवणे आवडते आणि त्यांनी आपल्या मुली वामिकाचा चेहरा अद्याप उघड केला नाही.
भारत आणि श्रीलंका दरम्यान होणाऱ्या टी२० आणि एकदिवसीय मालिकेसाठी भारतीय संघाची घोषणा झाली आहे. T20I साठी भारतीय संघाचा सूर्यकुमार यादव (कर्णधार) शुभमन गिल (उपकर्णधार) आणि जसप्रीत बुमराहला विश्रांती देण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील पिंपरी चिंचवड राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित गवाहणे, विद्यार्थी संघटनेचे प्रमुख यश साने, माजी नगरसेवक राहुल भोसले आणि पंकज भालेकर यांनी पक्षाचा राजीनामा दिला आहे.
परदेशात जाण्यासाठी पासपोर्ट असणे आवश्यक असते. तो नसेल तर आपल्याला परदेशात जाऊन प्रवास करता येत नाही. आपण घरी बसल्या पासपोर्टसाठी अप्लाय करू शकता.