महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर 'व्होट जिहाद' आणि 'एक है तो सुरक्षित है' या घोषणांमुळे राजकीय वातावरण तापले आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी या घोषणा दिल्या असून, विरोधकांकडून त्यावर टीका होत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे ज्यामध्ये ते देशद्रोही घोषणांवर संतापलेले दिसत आहेत. ते आपली गाडी थांबवून थेट काँग्रेस कार्यालयात जातात आणि तेथील लोकांना विचारतात, 'तुम्ही लोक असे शिकवता का?'.
काँग्रेसवर अल्पसंख्याकांना प्राधान्य देऊन इतर घटकांना कमकुवत करण्याचे आरोप भाजपने केले आहेत. ओबीसी कोट्यातून अल्पसंख्याकांना आरक्षण देणे, मुस्लिम पर्सनल लॉला सूट, तिहेरी तलाकला विरोध न करणे असे मुद्दे भाजपने उपस्थित केले आहेत.
कल्याण पश्चिम विधानसभेत शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाकरे गटाचे कल्याणमधील उपनेते विजय उर्फ बंड्या साळवी यांनी उपनेते पदाचा राजीनामा दिला आहे.