विनेश फोगटचे वजन 100 ग्रॅमने जास्त आढळल्याने तिला पॅरिस ऑलिम्पिकमधून अपात्र ठरवण्यात आले. तिच्या हृदयद्रावक अपात्रतेनंतर, विनेश फोगटचा पहिला फोटो समोर आला आहे.
विनेश फोगटने महिला कुस्तीच्या 50 किलो वजनी गटाच्या अंतिम फेरीत प्रवेश केला होता, परंतु वजनाच्या मर्यादा ओलांडल्यामुळे तिला अपात्र ठरवण्यात आले. त्यामुळे सोन्यासाठी अमेरिकेच्या सारा हिल्डब्रँडचा सामना क्यूबाच्या युस्नेलिस गुझमनशी होईल.
उद्धव ठाकरे यांनी बांगलादेशातील हिंदूंच्या सुरक्षेची जबाबदारी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टाकली आहे आणि केंद्र सरकारकडून हिंदूंचे रक्षण होणे आवश्यक आहे, असे म्हटले आहे. ते दिल्लीतील आघाडीच्या नेत्यांची भेट घेण्यासाठी आले आहेत.
बांगलादेशात सध्या राजकीय अस्थिरता आहे. शेख हसीना यांनी पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर आणि त्यांच्या प्रशासनाविरुद्ध आंदोलनांमुळे देश सोडून पळून गेल्यानंतरसरकारचे नेतृत्व नोबेल शांति पुरस्कार विजेते मुहम्मद युनूस यांना देण्यात आले आहे.
मुंबईतील कांदिवली पोलिसांनी बीएमसी रुग्णालयात काम करणाऱ्या ४० वर्षीय सफाई कामगार जयेश सोलंकीला अटक केली आहे. त्याच्यावर महिला डॉक्टर आंघोळ करत असताना तिचा व्हिडिओ बनवण्याचा आरोप आहे.
राज्य सरकारने विधानसभा निवडणुकीपूर्वी पोलीस उपायुक्त दर्जाच्या अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. नवी मुंबईच्या पोलीस उपायुक्त विवेक पानसरे आणि मुंबईच्या लोहमार्ग पोलीस उपायुक्त दत्ता नलावडे यांची बदली झाली आहे.
बांगलादेशात सध्या अस्थिरता आहे. पंतप्रधानपदाचा राजीनामा दिल्यानंतर शेख हसीना देश सोडून भारतात राहत आहेत. ब्रिटनकडून आश्रय मिळालेला नाही, त्यामुळे हसीना भारतातच राहणार आहेत.
यूएस-आधारित टेक कंपनी डेलने नोकरी कपातीची माहिती दिली आह. ब्लूमबर्गच्या एका रिपोटनुसार, हा निर्णय कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) उत्पादने आणि सेवांकडे वळवण्याच्या डेलच्या व्यापक प्रयत्नांचा एक भाग आहे.
विनेश फोगट आणि नीरज चोप्रा यांची अंतिम फेरीतील स्थानामुळे भारताच्या पदकाच्या आशा कायम आहेत, तर हॉकी संघाच्या पराभवामुळे त्यांना ब्राँझपदकासाठी स्पर्धा करावी लागेल.