पिंपरी चिंचवडच्या किवळे भागात 26 जुलैला रात्री मुलाने घराच्या इमारतीवरुन उडी घेत आपले जीवन संपवले. या घटनेनं परिसर हादरुन गेला आहे.
Paris Olympics: पॅरिस ऑलिम्पिक 2024 च्या आयोजनासाठी फ्रान्सला सुमारे $9.7 अब्ज खर्च येईल असा अंदाज आहे. सुरक्षेसाठी ४५ हजार पोलीस आणि शिपाई तैनात करण्यात आले आहेत.
केरळ हायकोर्टाने असा निर्णय दिला की बालविवाह प्रतिबंध कायदा, 2006, मुस्लिम वैयक्तिक कायद्याचे स्थान न घेता सर्व भारतीय नागरिकांना लागू होतो. पलक्कड येथील बालविवाहाच्या एका खटल्यात हा निकाल देण्यात आला.
या घटनेच्या सीसीटीव्ही फुटेजमध्ये तिघेजण आपली ओळख लपवण्यासाठी हेल्मेट घातलेले दिसत होते. त्यांनी 11 लाख रुपयांचे दागिने लुटून घटनास्थळावरून पळ काढला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू करण्यात आला आहे.
पीओके (पाकव्याप्त काश्मीर) येथील प्रसिद्ध कार्यकर्ते डॉ. अमजद अयुब मिर्झा यांनी जम्मू-काश्मीरमधील वाढत्या दहशतवादावर मोठा दावा केला आहे. पाकिस्तान पुन्हा कारगिलसारखे युद्ध सुरू करण्याच्या तयारीत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.