आयएएस उमेदवारी रद्द झाल्यानंतर, पूजा खेडकरने यूपीएससी विरोधात दिल्ली उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. विविध वादग्रस्त प्रकरणांमध्ये अडकलेल्या खेडकरने यूपीएससी, केंद्र सरकार आणि महाराष्ट्र सरकारला प्रतिवादी केले आहे.
LTMG हॉस्पिटल मुंबई येथे 1989 मध्ये स्थापन झालेल्या आशियातील पहिल्या ब्रेस्ट मिल्क बँकेने गेल्या 5 वर्षांत 43,412 मातांच्या देणग्यांद्वारे 10,000 नवजात बालकांना लाभ दिला आहे. बँक अकाली जन्मलेल्या, कमी वजनाच्या अर्भकांना दूध देणगी देऊन मदत करते.
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन बांगलादेशातून पळून गेल्याच्या पार्श्वभूमीवर भारतातील सीमा सुरक्षा दलाने 4,096 किमी भारत-बांगलादेश सीमेवरील सर्व युनिट्सना 'हाय अलर्ट' जारी केला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जम्मू-काश्मीरमधील कलम 370 रद्द करण्याच्या निर्णयावर प्रकाश टाकणारे नवे पुस्तक प्रकाशित होत आहे. '370: Undoing the Unjust, A New Future for J&K' या पुस्तकात या निर्णयामागील विचारप्रक्रियेचे, अंमलबजावणीचे सविस्तर वर्णन केले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पहिल्या हप्त्याचा मार्ग मोकळा झाला आहे. लाडकी बहीण योजनेला दिलेले आव्हान मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळले आहे.
मार्केट क्रॅश: सोमवारी सकाळी उशिरा झालेल्या व्यवहारांमध्ये सेन्सेक्स 2,037 अंकांनी 78,944 वर आणि निफ्टी 661 अंकांनी घसरून 24,056 वर आला आहे.
एका बाजूला उजनी धारण ओव्हरफ्लो होत असताना सातारा जिल्ह्यातील वीर धरणातूनही नीरा नदीत 42 हजार क्युसेक विसर्गाने पाणी सोडण्यास सुरुवात झाली आहे.
Who is Sita Shelke: केरळच्या वायनाड जिल्ह्यात भूस्खलनात देवदूत म्हणून पुढे आलेल्या मेजर सीता शेळके आहेत तरी कोण? मेजर सीता शेळके कार्याचा आढावा थोडक्यात जाणून घेऊयात.
Paris Olympics 2024: भारताने ग्रेट ब्रिटनला शूटआऊटमध्ये पराभूत करून उपांत्य फेरीत धडक मारली आहे. शूटआऊटमध्ये भारतीय गोलरक्षक पीआर श्रीजेशने दोन गोल वाचवून भारताला पदकाच्या पंक्तीत आणण्यात महत्त्वाची भूमिका बजावली.