भारताचा स्टार ॲथलीट नीरज चोप्रा पॅरिस ऑलिम्पिक २०२४ मध्ये सुवर्णपदक जिंकण्यासाठी भाग घेणारय. तो पुरुषांच्या भालाफेक स्पर्धेत अंतिम फेरीत खेळणारय. जर तो सुवर्णपदक जिंकला तर भालाफेकमध्ये विजेतेपदाचे रक्षण करणारा तो ऑलिंपिक इतिहासातील 5 वा व्यक्ती बनेल.
लोकसभेच्या पावसाळी अधिवेशनात वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक मंजूर करण्यात आले आहे. ज्यामुळे बोर्डाच्या अधिकारांवर अंकुश येणार आहे. विरोधी पक्षांनी या विधेयकाला विरोध केला असून ते सरकारवर समुदायांमध्ये वाद निर्माण करण्याचा आरोप करत आहेत.
गुरुवारी संध्याकाळी जपानच्या क्युशू प्रदेशातील मियाझाकी प्रीफेक्चरच्या किनारपट्टीवर 7.1रिश्टर स्केलचा शक्तिशाली भूकंप झाला. भूकंपामुळे त्सुनामीचा इशारा देण्यात आला आणि किनारी भागात तातडीने स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले.
म्हाडाच्या मुंबई मंडळातर्फे मुंबईत 2030 सदनिकांच्या विक्रीसाठी सोडत जाहीर केली. पहाडी गोरेगाव, अँटॉप हिल-वडाळा, कोपरी, पवई, कन्नमवार नगर-विक्रोळी, शिवधाम कॉम्प्लेक्स-मालाड येथे ही घरे उपलब्ध असून अर्ज नोंदणी 9 ऑगस्टपासून सुरू होणार आहे.
दिवसभरातील महत्त्वाच्या बातम्यांचा आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून आपण घेणार आहोत. यामध्ये देशभरासह राज्यातील राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर बातम्यांचे अपडेट्स तुम्हाला मिळणार आहेत.
मनोज जरांगे पाटील यांच्या जनजागृती आणि शांतता रॅलीचा दुसरा टप्पा सुरु झाला असून यावेळी त्यांनी फडणवीस, भुजबळ आणि आंबेडकर यांच्यावर जोरदार टीका केली. मराठा आरक्षणासाठी झालेल्या आंदोलनात झालेल्या गोळीबारासाठी त्यांनी फडणवीसांना जबाबदार धरले आहे.