पीएम मोदींनी युक्रेनचे अध्यक्ष व्लादिमीर झेलेन्स्की यांची भेट घेतली. दोन्ही देशांमधील द्विपक्षीय संबंध मजबूत करण्यावर चर्चा केली. भारताने रशिया-युक्रेनमधील युद्ध संपुष्टात आणण्यासाठी, शांतता प्रस्थापित करण्यासाठी सहकार्य करण्याची तयारी दर्शवली.
भारत-अमेरिका यांच्यात पाणबुडीविरोधी शस्त्रास्त्रांबाबत करार झाला. या कराराने भारताला AN/SSQ-53G अँटी-सबमरीन सोनोबॉय, AN/SSQ-62F अँटी-सबमरीन सोनोबॉय, AN/SSQ-36 सोनोबॉय मिळणारय. याने शत्रूंच्या पाणबुड्यांवर लक्ष ठेवणे,चोख प्रत्युत्तर देणे सोपे होणारय.
नाशिकमध्ये 10 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. खासगी क्लासमधील शिक्षकाने मुलीचा विनयभंग केल्याचा आरोप आहे. पीडित मुलीने आईला आपबिती सांगितल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला.
बदलापूर येथे दोन अल्पवयीन मुलींवर झालेल्या अत्याचार प्रकरणी चौकशी समितीचा प्राथमिक निष्कर्ष समोर आला आहे. निष्कर्षानुसार, मुलींवर गेल्या 15 दिवसांपासून अत्याचार होत होते आणि त्यांच्या गुप्त भागांना गंभीर दुखापत झाली आहे.
निवृत्ती जाहीर करणारे भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनची एकूण संपत्ती अंदाजे $17 दशलक्ष (INR 120 कोटी) आहे. त्याच्या उत्पन्नात BCCI करार, आयपीएल पगार, सामना शुल्क, जाहिराती, व्यवसाय उपक्रम आणि गुंतवणुकीचा समावेश आहे.
भारतीय क्रिकेटपटू शिखर धवनने क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. त्याने सोशल मीडियावरून व्हिडिओ पोस्ट करून ही घोषणा केली आहे. धवनच्या कारकिर्दीतील आणि खाजगी आयुष्यातील 15 खास गोष्टी या बातमीत सांगण्यात आल्या आहेत.
एशियानेट न्यूज पोर्टलवर 24 ऑगस्टच्या प्रमुख राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय बातम्या वाचा आणि ताज्या अपडेट्स जाणून घ्या फक्त एका क्लिकवर…