अकोला शहरातील एका पोलीस हवालदाराने तक्रार करण्यासाठी आलेल्या एका महिलेकडे शरीरसुखाची मागणी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या संबंधित तक्रार महिलेने जिल्हा पोलीस अधीक्षकांकडे केली आहे.
महाविकास आघाडीला मत देणं म्हणजे पाकिस्तानला मत देणे आहे असं वक्तव्य अमरावती लोकसभेच्या उमेदवार नवनीत राणा यांनी केलं आहे. काँग्रेसला लव लेटर पाकिस्तान लिहित आहे आणि उद्धव ठाकरे काँग्रेसचा प्रचार करतात असंही नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
बीडमधील पंकजा मुंडे यांच्या प्रचार सभेमध्ये बोलताना भाजप नेते उदयनराजे भोसले भावूक झाले होते. यावेळी ते म्हणाले की, पंकजा मुंडे यांना खासदार करा अन्यथा मी राजीनामा देऊन त्यांना साताऱ्यातून निवडून आणणार आहे.
आंध्र प्रदेशमध्ये शनिवारी पुन्हा एकदा मोठ्या प्रमाणात रोकड जप्त करण्यात आली आहे. पोलिसांनी तब्बल 7 कोटी रुपयांची रोकड जप्त करण्यात आली आहे.
बीडमध्ये दोन पैसे हाती आले की मस्ती येते असे म्हणत अजित पवारांनी महाविकास आघाडीचे उमेदवार बजरंग सोनावणेंवर निशाणा साधला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 31 मार्च ते 5 मे या पहिल्या तीन टप्प्यांत 83 प्रचारसभा घेऊन पहिल्या क्रमांकावर आहेत. तर काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांनी 40 निवडणूक प्रचारसभांना संबोधित करुन ते तिसऱ्या क्रमांकावर आहेत.
अतिशय संघर्षाची बनलेल्या बीड लोकसभा निवडणुकीच्या मैदानात आज उदयनराजे उतरणार आहेत. उदयनराजेंनी पंकजा मुंडेंना आपली बहिण मानले आहे. त्यामुळे बहिणीच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस आहे.
छत्रपती संभाजीनगरमध्ये लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा आज शेवटचा दिवस असून शिवसेना ठाकरे गट आणि मनसे आमने-सामने आली आहे.
नाशिक-मुंबई महामार्गावर दिवसाढवळ्या हत्येचा थरार घडला आहे. उत्तर महाराष्ट्र केसरी विजेत्याचा निर्घुण खून करण्यात आल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
ऐन उन्हाळ्यात महाराष्ट्रातील काही जिल्ह्यांमध्ये अकाळी पावसाने अक्षरश: धुमाकूळ घालायला सुरुवात केली आहे. पुण्यातही आज जोरदार पाऊस पडला आहे. त्याचबरोबर सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काही भागांना वादळी वारा आणि गारपिटीसह पावसाने झोडपले आहे.