शहरातील वृंदावन कॉलनीत आज पहाटेच्या सुमारास पतीने उशिने तोंड दाबून पत्नीचा खून करून स्वत: देखील दोरीने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. कौटुंबिक वादातून हा प्रकार घडल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे.
जिल्ह्यातील काटोल, कोढाळी भागात रविवारी दुपारी विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस झाला.
रेल्वेने सहाय्यक लोको पायलटच्या ५९८ पदांसाठी भरती अधिसूचना जारी केली असून त्यासाठी ७ जूनपर्यंत अर्ज भरता येणार आहेत.
दिल्लीतील अनेक शाळांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर आता काही दिवसांनी दिल्लीतील दोन रुग्णालयांना बॉम्बने उडविण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. बुरारी हॉस्पिटल आणि संजय गांधी हॉस्पिटलला ही धमकी देण्यात आली आहे.
पाकव्याप्ती काश्मीरमध्ये काश्मिरी जनता पाकिस्तानविरोधात रस्त्यावर उतरली आहे. पीओकेत मोठा हिंसाचार सुरु असल्याचे सोशल मीडियातून समोर येत आहे. जनतेने पोलीस आणि सरकारी अधिकाऱ्यांना पिटाळून लावले आहे.
तुरुंगातून सुटताच दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल कामाला लागले आहेत. आज अरविंद केजरीवाल यांनी पक्षाचा निवडणूक जाहीरनामाच जाहीर केला. यावेळी अरविंद केजरीवाल यांनी घोषणांचा पाऊस पाडला.
इंजिनिअरींग करणारी मुलगी राहत्या घरी लिंग निदान करत असल्याची बाब समोर आली आहे. तिच्या घरातून सोनोग्राफी जेल, प्रोब, लॅपटॉप इतर साहित्य जप्त करण्यात आले आहे.
देशभर मातृदिन साजरा केला जातो आहे. यातच भाजपाच्या अधिकृत सोशल मीडिया खात्यावरून पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि त्यांच्या आईच्या नात्याला उजाळा देण्यात आला आहे. त्याचबरोबर ही भारतभूमीही त्यांची आईच आहे असंही या व्हीडिओत सांगण्यात आले आहे.
उद्धव ठाकरे यांनी आपलेच कर्मचारी संजय राऊत यांना मॅनेज मुलाखत दिली असून ही मुलाखत म्हणजे काळू-बाळूचा तमाशाच असल्याची टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.
तमन्ना भाटिया यांनी ₹1.2 लाखाची खूप सुंदर आयव्हरी सिल्क साडी परिधान केली आहे. या सुंदर साडीत तमन्ना भाटिया खूपच सुंदर दिसत होती.